कृषी (agriculture) क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहेत. ज्यातून शेतकरी (farmer) शेती आणखी सोप्प्या पद्धतीने करू शकतो. कृषी क्षेत्रात इस्त्रायलचे तंत्रज्ञान सर्वोत्तम मानले जाते. याच तंत्रज्ञानाचा वापर करुन एका शेतकर्याने फक्त ७ हेक्टरवर सेंद्रीय पध्दतीने शेती (Organic farming) करत वर्षाला तब्बल १ कोटी रुपयांचे उत्पादन घेतले आहे.
शेतकरी केहराराम चौधरी यांनी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात दाता गावात गहू, बाजरी, मूग, मोठ, एरंड आणि रायडाच्या पारंपारिक लागवडीबरोबरच मेदजूल आणि बार्ही जातीच्या खजूरांची लागवड (planting) केली. ५ वर्षांपूर्वी ३५०० रुपये खर्चून दोन वेगवेगळ्या जातीच्या खजुरांची लागवड केली होती आणि ते ४ हेक्टर शेतात ही रोपे घेतली.
आता अवघ्या काही वर्षांच्या देखरेखीनंतर खजूरचे उत्पादन सुरू झाले आहे. खजुराच्या या जातीचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने (Organic farming) केले जात असल्याने कोणतीही रासायनिक खते व खतांचा वापर केला जात नाही.
असे करा नियोजन -
१) जुलै ते सप्टेंबर दरम्यान कोणत्याही प्रकारच्या जमिनीत रोपे लावता येतात.
२) एका रोपापासून दुसर्या रोपात आणि एका ओळीपासून दुसर्या ओळीत ८ मीटरचे अंतर ठेवावे.
३) एक हेक्टर मध्ये जवळपास तुम्ही १५६ झाडे लावू शकता.
Post Office Scheme; पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; गुंतवा फक्त 50 रुपये आणि मिळवा तब्बल 50 लाख रुपये
4) राजस्थानमध्ये सध्या ६ जाती पेरल्या जात आहेत. यामध्ये ४ मादी व दोन नर जाती आहेत.
5) मादी जाती- मेडजूल ३४३३ रुपये प्रति रोप, बार्ही २२३३ रुपये प्रति रोप, खालस २२३३ रुपये प्रति रोप आणि खुनईजी २१८३ रुपये प्रति रोप.
6) नर जाती – अलाइन सिटी रु. २४३३ प्रति रोप आणि घनामी रु. २९३३ प्रति रोप प्रमाणे मिळते.
महत्वाच्या बातम्या:
LPG सबसिडी मिळत नसल्यास त्वरित करा 'हे' काम; खात्यात जमा होतील पैसे..
मक्याला मिळतोय MSP पेक्षा जास्त भाव; आता शेतकऱ्यांचे नशीब बदलणार, करा वेळीच पेरणी
Share your comments