गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचं टेन्शन अधिकच वाढलं. अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला काही तयार नाही. आता पुन्हा एकदा गारपीट आणि अवकाळी पावसानं हजेरी लावली.
नांदेड जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट'
गारपीट आणि अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक उद्धवस्त होत आहे. अशात आता पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' लागू करण्यात आला आहे. हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात उद्या 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. तर आज म्हणजेच 3 मे 2023 या दिवसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे. तसेच नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन माहिती कार्यालयानं दिली आहे.
अकोला जिल्ह्यात पावसाची शक्यता
अकोला जिल्ह्यात आज अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात ३ ते ७ तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला प्रादेशिक मौसम विभाग नागपुरद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
तसेच वीज व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी त्रासले असून राज्य सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळं आणि गारपिटीमुळे पिकांवर मोठा परिणाम झाला आहे.
शेतमालाचा दर्जा घसरल्यामुळे दरातही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी कुटूंबाना मोठा दिलासा दिला आहे.
सामान्य धानाला जेवढी रक्कम दिली जाते तेवढीच रक्कम नुकसान झालेल्या पिकांना देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक बातम्या:
लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला लागणारी १० एकर जमीन कृषी विभागाकडून वर्ग केली जाणार : कृषी मंत्री अब्दुल सत्तार
पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार, ही 2 महत्त्वाची कामे लवकर उरका
खजूर शेती आहे खूपच फायद्याची, खजुराचे एक झाड देते हजारो रुपयांचे उत्पन्न, शेतकरी काही वर्षात करोडपती
Share your comments