1. बातम्या

कोरोनाच्या संकटात कृषी पर्यटनात संधी - पांडूरंग तावरे

कृषी पर्यटन या शेती पूरक व्यवसायाला चालना देण्याची वेळ आली आहे. ग्रामीण युवकांनी शहरात येण्यापेक्षा ग्रामीण संस्कृती, कला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करावी, अशी माहिती कृषी पर्यटनाचे प्रणेते पांडूरंग तावरे यांनी माध्यामांशी बोलताना दिली.

KJ Staff
KJ Staff

कृषी पर्यटन या शेती पूरक व्यवसायाला चालना देण्याची वेळ आली आहे. ग्रामीण युवकांनी शहरात येण्यापेक्षा ग्रामीण संस्कृती, कला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करावी, अशी माहिती कृषी पर्यटनाचे प्रणेते पांडूरंग तावरे यांनी माध्यामांशी बोलताना दिली.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. मागील एक महिना अर्थव्यवस्थेवर संकट आले आहे. पुढील अनेक महिने अर्थव्यवस्था पूर्ववत स्थितीत यायला जाणार आहे. अनेक क्षेत्रातील उद्योगधंद्यावर कोरोनाचा दूरगामी परिणाम राहणार आहे. देश विदेशातील पर्यटनाला सुध्दा याचा फटका बसणार आहे.

  सध्या ग्रामीण भागच असा आहे, की येथे कोरोना पोहचला नाही. येथील जीवनमान, पर्यावरण आणि आरोग्य यामुळे हे शक्य झाले आहे. परंतु शहरातील लोक आपल्या आजूबाजूच्या ५० ते १०० किमी परिसरातील पर्यटनाला भविष्यात नक्कीच प्राधान्य देतील. कमी खर्चात आणि एक दिवसाची चांगली टूर म्हणून कृषी पर्यटनाला महत्व येणार आहे. ग्रामीण युवकांनी या संधीचा फायदा घेण्याची वेळ आली आहे. कमी खर्चात उपलब्ध साधनसामुग्री च्या साह्याने कृषी पर्यटन केंद्र सुरू करावे असे आवाहन तावरे यांनी केले आहे. 

कृषी पर्यटन केंद्रासाठी मुलभूत गरज म्हणजे सुमारे पाच एकर शेती, शेती अवजारे, स्वागत कुटी, छोटासा हॉल, दोन छोट्या राहण्यासाठी खोल्या सुध्दा पुरेसे ठरते. येणाऱ्या पर्टकांना आपल्या शेतातील भाजीपाला, फळे, पीके यांची माहिती देणे. शेती निगडीत प्रकल्प दाखवणे. शेतातील कामे कशी करायची आणि ग्रामीण कला संस्कृती याची माहिती देणे. स्थानिक आहाराची पर्यटकांना मेजवानी देणे. आपल्या आजूबाजूच्या प्रदेशातील ऐतिहासिक, नैसर्गिक पर्यटन स्थळांना भेटी देणे ही सर्व जबाबदारी पर्यटन केंद्र चालकाने योग्य रीतीने पार पाडल्या या व्यवसायामध्ये चागली प्रगती केली जाऊ शकते.

 

कोरोना या संकटावर मात करून भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी युवकांनी ग्रामीण संस्कृतीचा प्रसार प्रचार करण्याची वेळ आली आहे.  कृषी पर्यटन केंद्र ही काळाची गरज बनली आहेत. येथील स्वच्छता आणि आरोग्याची काळजी बाबत या केंद्रांनी दक्ष राहिले पाहिजे, असे तावरे यांनी सागितले. महाराष्ट्रात ९ कृषी हवामान विभाग आहेत. ७२० किमी समुद्र किनारा लाभला आहे.  सह्याद्री पर्वतरंगांच्या कुशीत निसर्ग संपतीचा खजिना दडला आहे. म्हणूनच मागील दोन आर्थिक वर्षात ६०० शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्राद्वारे सुमारे ५० कोटीचा व्यवसाय केल्याची माहितीही त्यांनी दिली.

English Summary: Opportunity in agro-tourism in the corona crisis - Pandurang Taware Published on: 17 July 2020, 12:53 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters