नवी दिल्ली - गृहणींसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. येत्या काही दिवसात गृहणींच्या बजेटमध्ये बचत होऊ शकते. हो, नवीन शेतमालाची आवक वाढल्याने महिन्याभरात कांदा, टमाटे आणि बटाट्यांचा दर १० ते १५ टक्क्यांनी कमी होणार आहेत. लासलगावात ठोक कांद्याची किंमत १ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल आहे. एप्रिल महिन्यात दराची घसरण होत ९०० ते १ हजार ४०० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. यामुळे किरकोळ किंमतींमध्येही घसरण होईल, असा अंदाज अॅग्री बिजनेस रिसर्च अँड इंफर्मेशन फर्म अॅग्रीवॉचचे मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर नटराजन यांनी व्यक्त केला आहे.
मननाडमध्ये कांद्याची आवक ही ५ हजार क्किंटल असून बाजार भाव ५०० ते १७६० रुपये प्रति क्किंटल आहे. तर सर्वसाधरण दर १ हजार ५५० रुपये आहे. दिल्लीच्या आजादपूर बाजारात मागील महिन्यात कांदाची ठोक किंमत १६ टक्क्यांनी खाली आल्या. तर टमाट्यांच्या किंमती दर ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. दरम्यान मागील महिन्यात आझादपूर बाजारात बटाट्यांची किंमती २० टक्क्यांनी वधारल्या आहेत. खराब वातावरण आणि काही भागात पाऊस झाल्याने बटाट्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या बाजारात २३- २५ रुपये प्रति किलो रुपये असा दर आहे. परंतु नवीन शेतमाल बाजारात बाजारात आल्यानंतर चालू दरावरुन बटाट्यांचा दर १५ टक्क्यांनी घसरतील अशी शक्यता आहे. राज्यासह, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या बाजारात नवीन शेतमाल येत आहे. यामुळे कांदा, बटाटा, टमाट्यांचा दर कमी होण्याची शक्यता आहे. यासह नवरात्र उत्सव सुरु झाल्यानंतर कांद्याची मागणी अजून घटेल.
Share your comments