केंद्र शासनाने 14 सप्टेंबर रोजी केलेल्या कांदा निर्यात बंदी जाहीर करून शेतकर्यांच्या मुळावरच घाव घातल्याचे दिसून आले. कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवण्याची मागणी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. सध्याच्या कांद्याच्या परिस्थितीचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे फार थोड्या प्रमाणात कांदा उपलब्ध असल्याने तसेच वातावरण बदलामुळे कांदा चाळीत सडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते, अशा परिस्थितीत निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मुळावरच घाव घातल्याने शेतकरी संतप्त आहेत.
तशातच साठवणूक केलेला उन्हाळी कांदा सध्या विक्रीसाठी शेवटच्या टप्प्यात आहे. तसेच लाल कांदा विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहे. सध्या आवक साधारण असतानाही दर घसरताना दिसत आहेत. शनिवारी उन्हाळी कांद्याचे दर चौदाशे पर्यंत खाली आले होते. दरात घसरण होऊनही निर्यातबंदी का उठत नाही असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. कोणाच्या कालावधीमध्ये दरात घसरण होऊन उत्पादन करता च्या खाली कांदा विक्री झाली. त्यातच पुढे बाजारपेठ सुरळीत होऊन दर वाढले मात्र केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी, साठवणुकीवर घातलेली मर्यादा, व्यापाऱ्यांवर पडलेल्या आयकर विभागाचे छापे यामुळे कामकाज अस्थिर आहे.
हेही वाचा :बाजार दर: तेल-तेलबियाच्या बाजारपेठेत एकदम घट , डाळींचे दरही खाली आले
महिन्याच्या शेवटी काही अशी स्थिर असलेल्या बाजारात पुन्हा घसरण सुरू झाली आहे. त्यातच गेल्या तीन दिवसात शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजार समिती दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आवक अत्यंत कमी असूनही दरात घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. सध्याचे भारतातील पाऊस, दिल्लीमधील शेतकऱ्यांचे आंदोलन याचा परिणाम थेट मालाच्या पुरवठ्यावर झाला आहे. भारताच्या उत्तर भागात महाराष्ट्रातून कांदा जातो. परंतु सध्या मागणी व पुरवठा साखळी बिघडल्याने किमान बांगलादेश व नेपाळ या लगतच्या देशात कांदा निर्यात सुरू करावी अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.
Share your comments