मागील काही वर्षांपासून कांद्याला बाजारपेठेत सरासरीपेक्षा किमान प्रमाणात दर मिळत आहेत. नगदी पिकात उसाच्या मागोमाग कांद्याचे पीक घेतले जाते. सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांचा कल कांदा पिकातून नाही तर कांद्याच्या बियाणातुन उत्पन्न घेत आहेत. जो की हा प्रयोग यशस्वीरित्या पार पडत आहे. कांदा बीजोत्पादनाच्या क्षेत्रात पिकावर गेंद पकडला आहे मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे ढगाळ वातावरण झाल्याने गेंदावर अळीचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे आता बीजोत्पादन योग्य पद्धतीने तयार होते की नाही अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित राहिली आहे. शेतकऱ्यांनी जर योग्य वेळी या अळीवर बंदोबस्त केला तरच शेतकऱ्यांचे उत्पादन घटणार नाही. यंदाच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी बीजोत्पादनाचा प्रयोग केला आणि त्याचा फायदा ही शेतकऱ्यांना झाला आहे .
कांदा बियाणे मागणीत वाढ :-
कांद्याची लागवड करायची म्हणले की बियाणे विकत आणायचे आणि त्याची लागवड करायची ही पहिल्यापासूनच पद्धत राहिलेली आहे. दिवसेंदिवस बियांनाना वाढीव मागणी असल्यामुळे शेतकरी स्वतः कांदा बीजोत्पादन करून बियाणे निर्मिती करू लागले. असे केल्याने कांद्याची लागवड तर करता येतेयच सोबतच बियानाला ३ हजार प्रति किलो असा दर ही भेटत आहे. कांद्याचे बीजोत्पादन करून बियाणांचे उत्पन्न घेणे हे आता शेतकऱ्यांचे एक साधन च बनले आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांसोबत करार केल्याने कांद्याच्या बियांनाना प्रति क्विंटल ३५ ते ५५ हजार दर भेटत आहे.
कोणत्या अवस्थेत आहे बिजोत्पादनातील कांदा?
लागवड केल्यानंतर बीजोत्पादनातील कांदा हा गेंद अवस्थेमध्ये असतो. हंगामाच्या सुरुवातीला लागवड केलेल्या पिकाला गेंद अवस्थेत बी धरू लागले आहे तर काही ठिकाणी हे बी परिपक्व असते. यावेळी मधमाशांची संख्या कमी आहे त्यामुळे परागिकरणाची प्रक्रिया प्रभावित झालेली आहे. यावर जरी उपाययोजना केल्या जात असल्या तरी सुद्धा मधमाशा आकर्षित झालेल्या नाहीत त्यामुळे आता पुन्हा किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे जे की शेतकरी चिंतेत आहेत.
किडीवर काय आहे उपाययोजना?
सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्यामुळे कांद्याच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढेल असा धोका निर्माण झालेला आहे, जे की आता कांदा पिकावर जैविक औषधांची फवारणी करणे गरजेचे झाले आहे. नेटारायझेम, व्हर्टीकेलीया या औषधांची कांद्यावर फवारणी करणे गरजेचे आहे. कांदा पिकावर अळीचा प्रादुर्भाव होताच त्यावर या औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे तसेच जर पाऊसाने आपली हजेरी लावली तर तो पुन्हा उघडेपर्यंत याच औषधांचा डोस देणे गरजेचे आहे असे कृषितज्ञ रामेश्वर चांडक सांगतात.
Share your comments