दक्षिण भारतात सोबतच राजस्थान मधील कांद्याचे पावसाने नुकसान केल्याने देशांतर्गत नाशिकच्या उन्हाळी कांद्याचा भाव किलोला 42 रुपये पर्यंत पोहोचला. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार कांद्याच्या निर्यात बंदीचा विचार करत असल्याने तेथील फळे व भाजीपाला निर्यातदार,आयातदार आणि व्यापाऱ्यांच्या संघटनेने विरोध दर्शवला आहे.
त्यातच सोमवारी भारता तर्फे निर्यात बंदीचा विचार होऊ शकतो अशा अफवा पसरल्याने व्यापाऱ्यांमध्ये चलबिचल झाली.येत्या काही दिवसांमध्ये नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल पण शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याचा भाव अधिकचा झाला असल्याने शेतकऱ्यांना जास्त भावाचीअपेक्षा आहे. ही स्थिती एकीकडे असताना कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून व चेन्नई मधून जाणाऱ्या कांद्याचे बिलिंग बंद झाल्याची अफवा पसरल्याने निर्यातदारांना त्याबद्दलची खात्री करून घेण्यासाठी सायंकाळ झाली.
बिलिंग बंद झाले नसल्याची माहिती मिळाली आणि निर्यात दारांनी सुटकेचा निश्वास सोडला. 2019 आणि 2020 मध्ये सप्टेंबर मध्ये कांद्याची निर्यातबंदी केंद्र सरकारने केली होती. दोन हजार एकोणवीस ची निर्यात बंदी मार्च दोन हजार वीस मध्ये तर गेल्या वर्षी ची निर्यात बंदी जानेवारी 2021 मध्ये उठवण्यात आली होती. नेमका हा अनुभव जमेस असल्याने निर्यातदारांच्या न जरा केंद्र सरकारच्या या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागले आहेत.
देशांतर्गत कांद्याची स्थिती
- राजस्थान– पावसाने राजस्थान मधील कांद्याचे जवळ जवळ 30 टक्क्यांपर्यंत नुकसान केले आहे. मात्र राजस्थान मधील शेतकऱ्यांनी 25 टक्के अधिक उत्पादन घेतले असून या महिन्याच्या मद्याला नवीन कांद्याची आवक अपेक्षित आहे. त्यावरून राजस्थानच्या कांद्याची आवकमध्ये फारसा फरक पडणार नाही असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे.
- दक्षिण भारत- कांद्याचे पावसाने नुकसान झाले आहे. पण हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत आहे. शिवाय दक्षिण भारतात मागील दोन वर्षातील नुकसानीच्या अनुभवामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड आधीककेली आहे.
- राजस्थान आणि दक्षिण भारतात सोबतच मध्यप्रदेशातील कांद्याची आवक सुरू होणार आहे.
कांद्याचे जागतिक स्थिती
सध्या कांदा व्यापार्यांकडून पाकिस्तानचा कांदा मलेशियामध्ये 370 डॉलर टन या भावाने पोच दिला जातो. दुबई साठी हाच भाव 390 डॉलर आहे. दुसरीकडे मात्र मलेशियामध्ये भारतीय कांदा पाठवण्यासाठी आत्ताच्या भावाने 610 डॉलर, तर दुबई साठी 580 डॉलरपर्यंत भाव पोचणार आहे. म्हणजेच भारतीय कांद्याला पाकिस्तानच्या तुलनेत किलोला 15 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढल्याने निर्यातदारांनी ही देशांतर्गत कांदा पाठवण्यात लक्ष केंद्रित केले आहे.
Share your comments