1. बातम्या

कांद्याच्या भावात क्विंटलमागे पाचशे रुपयाची घसरण; निर्यात बंदीच्या अफवेचे पडसाद

उन्हाळी कांद्याचे भावकिलोला 40 ते 42 रुपये पर्यंत पोहोचले होते. परंतु मंगळवारी जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये सकाळच्या लीलावा वेळी क्विंटलच्या मागे एक हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली. साठवण केलेल्या उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने दुपारनंतर काहीशी भावा मध्ये सुधारणा पाहायला मिळाली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion market

onion market

 उन्हाळी कांद्याचे भाव किलोला 40 ते 42 रुपये पर्यंत पोहोचले होते. परंतु मंगळवारी जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये सकाळच्या लीलावा वेळी क्विंटलच्या मागे एक हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली. साठवण केलेल्या उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने दुपारनंतर काहीशी भावा मध्ये सुधारणा पाहायला मिळाली.

परंतु तरीही पाचशे रुपयांचे सरासरी घसरण होतीच. सोमवारच्या तुलनेत जर विचार केला तर कळवणमध्ये 450, चांदवड मार्केट ला पन्नास, सटाणा मार्केटला सव्वाशे तर नामपुर मार्केट मध्ये 250 रुपयांनी भाव कमी झाला.

 तर पिंपळगाव मध्ये 164 रुपये आणि देवळात 100 रुपयांनी सरासरी भाव जास्त मिळाला.

देशांतर्गत मागणीचा विचार केला तर येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे भाव क्विंटलला साडेतीन हजाराच्या आसपास राहण्याची चिन्हे आहेत.लासलगाव मार्केटचा विचार केला तर नवीन लाल कांद्याच्या भावात चोवीस तासांमध्ये प्रति क्विंटल 60 रुपये वाढ पाहायला मिळाली. लासलगाव बाजारपेठेत नवीन लाल कांद्याला सोमवारी क्विंटलला सरासरी दोन हजार तीनशे चाळीस रुपये असा भाव मिळाला. कांदा निर्यात दर व्यापाऱ्यांनी कर्नाटक मधून नवीन कांद्याची खरेदी अडीच हजार रुपये क्विंटल सरासरी भावाने केली आहे. हा कांदा जिल्ह्यात आणून फिलिपाईन्स साठी 580 डॉलर प्रति टन या भावानेनिर्यात करण्यात येत आहे.

 

दक्षिणेकडील राज्यांचा विचार केला तर त्यासोबतच राजस्थान आणि मध्यप्रदेश मधून नवीन कांदा येण्यासाठी अजून पंधरा दिवसांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत आपल्याकडील पाठवलेल्या उन्हाळी कांद्याला देशांतर्गत मागणी राहण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु शेतकऱ्यांनी पेनिक सेलिंग कडे कल वाढवला आणि वाढलेला भाव मिळवण्यासाठी  मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणल्यास भावाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. तसेच कांद्याची देशांतर्गत मागणी वाढल्याने  कांदा  निर्यातीकडे कल काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे.( स्त्रोत-सकाळ)

English Summary: onion rate decresed 500 hundred rupees per quintql Published on: 06 October 2021, 09:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters