1. बातम्या

कांद्याचे भाव गगनाला भिडले,मात्र ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले.

यंदाच्या वर्षी पावसामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. खरीप हंगामातील पिके तर बऱ्यापैकी वाहूनच गेलीत. तसेच याच पावसाचा सर्वात जास्त परिणाम हा उत्पन्नावर झाला आहे.ह्या वर्षी पावसामुळे शेतकऱ्याच्या खरीप पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले असले तरी कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणलेले आहेत.

किरण भेकणे
किरण भेकणे
onion

onion


यंदाच्या वर्षी पावसामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. खरीप हंगामातील पिके तर बऱ्यापैकी वाहूनच गेलीत. तसेच याच पावसाचा सर्वात जास्त परिणाम हा उत्पन्नावर झाला आहे.ह्या वर्षी पावसामुळे शेतकऱ्याच्या खरीप पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले असले तरी कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणलेले आहेत.

कांद्याला सर्वाधिक भाव म्हणजेच 4393 रुपये प्रति क्विंटल:

दिवसेंदिवस कांद्याचे भाव हे वाढतच चालले आहेत. तसेच बाजारात कांद्याची आवक ही कमी येत असल्याने कांद्याचे भाव वाढतच राहतील असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जात आहे.कांदा हे एक रोख रक्कम मिळवून देणारे म्हणजेच एक प्रकारचे नगदी पीक आहे. बऱ्याच कांदा(onion) एक तर शेतकऱ्याच्या डोळ्यात  पाणी  आणतो  नाहीतर  ग्राहकाच्या डोळ्यात पाणी आणत असतो.पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे  परंतु  कांद्याच्या वाढत्या  भावामुळे शेतकरी सुद्धा सुखावला आहे.गुरुवारी बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव म्हणजेच 4393 रुपये प्रति क्विंटलचा एवढा भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी झालेला आहे. बाजारात कांद्याची आवक ही कमी येत असल्याने कांद्याचे भाव वाढतच  चालले  आहेत. तस म्हटलं तरी कांद्याचे भाव वाढीस सुद्धा सर्वात जास्त जबाबदार हा पाऊस च आहे. पाबसमुळे कमी जास्त 40 ते 50 टक्के कांदा हा खराब होऊन गेला आहे. त्यामुळं बाजारात कांद्याची आवक कमी झालेली आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी कांदा बाजरपेठे लासलगाव येथे 3350 ते 4134 प्रति क्विंटल या भावाने कांदा विकला आहे.महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या  राज्यांमध्ये  कांद्याची  लागवड मोठया प्रमाणात होते. परंतु नैसर्गिक आपत्ती मुळे निम्याहूम जास्त क्षेत्र कांदा खराब होऊन गेला आणि बाजारात कांद्याची आवक घेतली. यामुळे शेतकऱ्याचं सुदधा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात कांद्याची आवक ही कमी आहे त्यामुळे कांद्याचे भाव भविष्यात सुद्धा मोठया प्रमाणात वाढतील असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे.

कांद्याची योग्य साठवणूक करून सुद्धा भाव जास्त येईल तेव्हा कांद्याची विक्री आपण करू शकतो. कांदा हे एक नाशवंत  पदार्थ  आहे. आणि  पावसामुळे  साठवलेला  चाळीतील  कांदा भिजल्यामुळे पूर्णपणे खराब झालेला आहे. तसेच या वर्षी सुद्धा उत्पादन प्रक्रियेत मोठी घट झालेली आहे त्यामुळं कांद्याचे भाव हे वाढत चालले आहेत.

English Summary: Onion prices skyrocketed, but brought tears to the eyes of consumers Published on: 16 October 2021, 09:33 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters