मागील महिन्यात कांद्याचे चांगल्या प्रकारे दर टिकून होते. लाल कांद्याचे तसेच उन्हाळा कांद्याचे दर चांगल्या प्रति टिकून राहिले असल्यामुळे कांद्याचा पैसे च झाले. मात्र मागील आठ दिवसात असे काय घडले जे की शेतकरी तरी कोमात गेलेच पण सोबतच व्यापाऱ्यांचे सुद्धा गणित हुकले. मागील आठ दिवसांमध्ये लाल कांद्याच्या दरात जवळपास ७६४ रुपयांनी घसरण झाली तर उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये ६३० रुपयांनी घसरण झाली. बाजारपेठेत मागणीपेक्षा जास्त आवक झालीच पण रशिया आणि युक्रेन च्या युद्ध परिस्थितीमुळे कांदा निर्यातीत सुद्धा अडचण निर्माण झाली. अगदी एक रात्रीत कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादकांना ११ कोटी ७२ लाख रुपयांचा फटका बसला आहे.
आवक वाढ्यालाचा दरावर परिणाम :-
दिवसेंदिवस तापमान वाढतच असल्यामुळे देशातील मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक वाढत आहे. उन्हाळी कांद्याची आवक कमी जास्त होत आहे जे की देशात मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक प्रमाणात पुरवठा होत आहे. २६ फेब्रुवारीला लाल कांद्याला बाजारात २६२५ रुपये असा भाव मिळत होता तर ५ मार्च रोजी लाल कांद्याला १८६१ रुपये अवध बाजारभाव मिळाला असल्याने प्रति क्विंटल कांद्याच्या दरात ७६४ रुपयांनी घसरण झालेली आहे. २६ फेब्रुवारी रोजी उन्हाळी कांद्याला बाजारात २४३० रुपये असा कमाल भाव मिळाला होता तर त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच ५ मार्च रोजी उन्हाळी कांद्याला १८०० रुपये बाजारभाव मिळाला जे की प्रति क्विंटलमागे ६३० रुपयांची घसरण झाली.
कांदा उत्पादकांचे कोट्यावधींचे नुकसान :-
देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ लासलगावमध्ये मागील आठ दिवसात १ लाख ४१ हजार ९६९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती जे की आता त्यामध्ये ७६४ रुपयांची घसरण झाली असल्यामुळे कांदा उत्पादकांना १० कोटी ८४ लाख ६४ हजार ३१६ रुपयांचा फटका बसलेला आहे. तसेच नवीन उन्हाळी कांद्याची २ हजार ५५२ क्विंटल आवक झालेली असून या आठ दिवसात ६३० रुपयांनी कांद्याचे दर घसरले आहेत. नाशिक जिल्ह्यात १७ कांद्याच्या बाजार समित्या आहे जे की घसरलेल्या दरामुळे ८० ते १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
उन्हाळी कांद्याची आवक सुरु :-
यंदा बाजारपेठेत कांद्याचे दर टिकून राहिले असल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढून घेतला. लाल कांद्याची आवक सुरू असताना उन्हाळी कांद्याची आवक सुद्धा सुरू झाली. त्यामुळे लाल कांदा साठवला गेला पण आता नव्याने उन्हाळी कांदा बाजारामध्ये दाखल झाला असल्यामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली. त्यामुळे बाजारपेठेची सूत्रे तर हाललीच पण त्यासोबत कांद्याचे दर सुद्धा घसरले.
Share your comments