नाशिक: राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो, हे जरी वास्तव असलं तरी मात्र यामध्ये सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा वाटा आहे. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात राज्याचा मोठा वाटा आहे आणि राज्याच्या एकूण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे, या भरमसाठ कांद्याच्या उत्पादनामुळे नाशिक जिल्ह्याला कांद्याचे आगार, कांद्याचे गोदाम इत्यादी नावांनी संबोधले जाते. याच कांद्याच्या आगारातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची बातमी समोर येत आहे. जिल्ह्याच्या सिन्नर एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या नांदूर शिंगोटे उपबाजार समितीत सोमवारी विक्रमी कांद्याची आवक बघायला मिळाली.
हाती आलेल्या माहितीनुसार, या उपबाजार आवारात सुमारे 23 हजार क्विंटल कांद्याची आवक बघायला मिळाली. विक्रमी कांद्याची आवक झाली खरी मात्र यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटल मागे पाचशे रुपयाचा फटका बसला. सोमवारी नांदूर शिंगोटे उपबाजार आवारात क्विंटलमागे पाचशे रुपयांची घसरण नमूद करण्यात आली. या उपबाजारात कांद्याला सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. सोमवारी झालेली आवक ही या हंगामातील सर्वात उच्चांकी आवक असून मागील तीन वर्षात देखील अशी आवक झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सिन्नर एपीएमसी अंतर्गत नांदुर-शिंगोटे व दोडा बुद्रुक या दोन उपबाजार समिती कार्य करीत आहेत. नांदुर-शिंगोटे येथे सोमवारी व शुक्रवारी या दोन दिवशी कांद्याचा लिलाव घेतला जातो, तसेच दोडा बुद्रुक येथे केवळ बुधवारी कांद्याचा लिलाव पार पडत असतो.
गेल्या काही महिन्यांपासून विशेषता या हंगामात या दोन्ही बाजार समित्यांना शेतकऱ्यामार्फत विशेष पसंती दर्शवली जात आहे, याचे विशेष कारण म्हणजे या दोन्ही उपबाजार समितीत कांद्याचा लिलाव होताच शेतकऱ्यांना रोख स्वरूपात परतावा दिला जातो. बाजार समित्यांचा हा व्यवहार शेतकऱ्यांना विशेष रास येत आहे, त्यामुळेच की काय सोमवारी नांदुर-शिंगोटे उपबाजारात या हंगामातील विक्रमी आवक नमूद करण्यात आली. सोमवारी दुपारी दोन ते चारच्या दरम्यान उपबाजारात वाहनांची कांदा विक्रीसाठी एकच धावपळ बघायला मिळत होती, या दिवशी कांद्याची एवढी मोठी आवक होते की सर्वच खरेदीदार व व्यापार्यांचे खळे हाउसफुल बघायला मिळाली.
रात्री उशिरापर्यंत उपबाजारात शेतकर्यांची कांदा विक्रीसाठी लगबग बघायला मिळाली कांद्याचे सौदे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कांद्याची बंपर आवक आणि राज्यात सर्वत्र ढासळलेला कांद्याचा बाजार भाव यामुळे या उपबाजार समितीत देखील कांद्याच्या भावात मोठी घट झाली. गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सुमारे पाचशे रुपये क्विंटल मागे घसरण झाल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी लाल कांद्याला सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला तर जास्तीत जास्त 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर यावेळी बघायला मिळाला, मात्र किमान दर केवळ 300 रुपये एवढा नमूद करण्यात आला.
Share your comments