आपल्या रोजच्या आहारात बनविण्यात येणाऱ्या प्रत्येक भाजीला लसूण (Garlic) गरजेचा असतो. लसणाची फोडणी दिल्याशिवाय कोणतीही भाजी केली जात नाही. लसणाला एवढी किंमत असताना त्याला कवडीमोल बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मिळत असलेला कांदा (onion) बाजारभावमुळे अगोदरच शेतकरी चिंतेत आहेत. कांद्यापाठोपाठ आता लसणाचेही दर कोसळण्याची शक्यता आहे. सध्या शेतकऱ्यांना मंडईत लसणाचा कमाल भाव 3 हजार रुपये किलोपर्यंत मिळत आहे. आझादपूर मंडईत लसणाला मिळत असलेला दर पाहून तुम्ही सुद्धा हवालदील व्हाल.
सरकारकडून तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन; 8 लाख बियाणांचे मिनीकिट्सचे शेतकऱ्यांना मोफत वाटप
लसणाचे दर कोसळण्याचे कारण म्हणजे भरपूर उत्पादन. प्रत्यक्षात यावेळी मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात लसणाचे बंपर उत्पादन (Bumper production garlic) झाले आहे. त्याचा परिणाम लसणाच्या भावावर झाला असून त्यात मोठ्या प्रमाणात घट नोंदवली गेली आहे.
महाराष्ट्रात लसणाला कमाल बाजारभाव 3 हजार पाचशे रुपये, सर्वसाधारण बाजारभाव 2 हजार तर कमीत कमी 1 हजार 700 रुपये मिळत आहे. दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रात चांगला दर आहे. परंतु येथील दर उतरण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे.
पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; दरवर्षी मिळणार 1 लाख 11 हजार रुपये
आझादपूर मंडईत लसणाचा भाव 5 ते 30 रुपये किलो
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या आझादपूर मंडईत (Azadpur Mandai) आजकाल लसणाचा घाऊक भाव 5 ते 30 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून शेतकऱ्यांच्या शेतातून लसूण बाजारात आणला जात असताना बाजारात लसणाचा हा भाव आहे. भरपूर माल येत मंडईत ही परिस्थिति निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
लाल कंधारी गाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार बनेल; दूध उत्पादनातून मिळतो लाखोंचा नफा
शेतकरी मित्रांनो तंत्रशुध्द पध्दतीने ज्वारीची लागवड करा; मिळेल अधिक उत्पन्न
आता CIBIL स्कोअरशिवाय कर्ज मिळणार; एलआयसीची 'ही' योजना शेतकऱ्यांना देतेय मोठी संधी
Share your comments