पुणे : देशातील कांद्याच्या भावात होणारी चढाओढ कमी करून सामान्य माणसांना कांदा परवडण्यासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान असणार आहे. केंद्र सरकारने सामान्य लोकांना कांदा परवडावा, त्याचे भाव आवक्यात राहावे. यासाठी केंद्र सरकरने कांदा स्थिरीकरण योजनेअंतर्गत १ लाख टन कांद्याची खरेदी करायची ठरवले असून महाराष्ट्रातून तब्बल ८० हजार टन कांदा खरेदीपैकी ७२ हजार टन कांदा खरेदी पूर्ण झाली असून त्यामुळे देशातील कांद्याचे दार स्थिर राहणार आहेत
देशात कांद्याच्या भावात कायम चढाओढ असते. कांद्याने बऱ्याचवेळा शंभरी पार केली आहे. त्यामुळे कांदा सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल आहे. देशात निवणुकीच्या काळात कांडा महाग झाला की त्याचे पडसाद निवडणुकीत पाहायला मिळतात. त्यामुळे सरकारने कांडा स्थिरकन निधीची स्थापना केली आहे. या निधीअंतर्गत महाराष्ट्रातून ८० हजार टन, गुजरात १० हजर टन, मध्यप्रदेश १० हजार टन असे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्र हे देशाचे कांद्याचे भांडार म्हणून ओळखले जाते. नाशिक जिल्हा हा कांद्यसाठी प्रसिद्ध आहे. लासलगाव मार्केट हे कांद्याचे सर्वात मोठे मार्केट आहे.
Share your comments