1. बातम्या

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक संकटात! मात्र केरळ आणि बिहार राज्यात भेटतोय कांद्याला अधिकचा दर, वाचा सविस्तर

देशामध्ये कांदा उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्याचा नंबर लागतो. परंतु महाराष्ट्रात कांद्याला योग्य तो दर मिळत नाही असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी प्रति क्विंटल १५० रुपये कांदा तर काही ठिकाणी २०० रुपये प्रति क्विंटल ने कांदा विकला जात आहे. मात्र दुसऱ्या राज्यांमध्ये कांद्याला भाव मिळत नाहीये. का? महाराष्ट्रात सुद्धा ही परिस्थिती आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कांद्याला जास्त भाव मिळत आहे. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी ५.६१ टक्के कांद्याचे उत्पादन हे बिहार मध्ये घेतले जाते. जे की बिहार राज्यात कांद्याला १००० ते १६०० रुपये भाव मिळत आहे. उत्तरप्रदेश मध्ये देखील कांद्याला चांगल्या प्रकारे भाव मिळत आहे. केरळ मध्ये कांद्याला बाजारात ४५०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
onion

onion

देशामध्ये कांदा उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्याचा नंबर लागतो. परंतु महाराष्ट्रात कांद्याला(onion) योग्य तो दर मिळत नाही असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी प्रति क्विंटल १५० रुपये कांदा तर काही ठिकाणी २०० रुपये प्रति क्विंटल ने कांदा विकला जात आहे. मात्र दुसऱ्या राज्यांमध्ये कांद्याला भाव मिळत नाहीये. का? महाराष्ट्रात सुद्धा ही परिस्थिती आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कांद्याला जास्त भाव मिळत आहे. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी ५.६१ टक्के कांद्याचे उत्पादन हे बिहार मध्ये घेतले जाते. जे की बिहार राज्यात कांद्याला १००० ते १६०० रुपये भाव मिळत आहे. उत्तरप्रदेश मध्ये देखील कांद्याला चांगल्या प्रकारे भाव मिळत आहे. केरळ मध्ये कांद्याला बाजारात ४५०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे.

बिहारमध्ये काय स्थिती?

बिहार राज्यातील किशनगंज जिल्ह्यामधील ठाकुरगंज बाजारपेठेत १५ मे ला किमान १८५० रुपये प्रति क्विंटल दर भेटत आहे तर २१०० ते २००० रुपये कमाल असा तेथील कांदा उत्पादकांना भाव मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोले यांनी म्हणले आहे की महाराष्ट्रात टेटर्स लॉबी मजबूत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

हेही वाचा:आशियातील गहू आयातदार भारताने गहू निर्यातीवर बंदी घालताच आले मोठ्या संकटात

उत्पादन चांगलं, पण दर नाही :-

महाराष्ट्र राज्यात यंदाच्या वर्षी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन निघाले आहे मात्र अपेक्षित असा कांद्याला दर(rate) मिळू शकलेला नाही. बाजारात कांद्याला प्रति किलो ४ ते ५ रुपये भाव मिळत आहे जे की यामुळे कांद्याला किमान आधारभूत किमंत मिळावी अशी मागणी कांदा उत्पादक वर्गाने केलेली आहे. कांदा उत्पादकांना एमएसपीशिवाय फायदा कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यंदा महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणत नुकसान सहन करावे लागत आहे जे की योग्य दर भेटत नसल्यामुळे कांदा उत्पादक हतबल झालेला आहे.

महाराष्ट्राव्यतिरीक्त कुठे किती भाव?

१. बिहार राज्यातील अररीयामध्ये कांद्याला प्रति क्विंटल किमान १२०० रुपये भाव तर कमाल १४०० रुपये भाव भेटत आहे.

२. बिहार राज्यातील बाकामध्ये कांद्याला प्रति क्विंटल किमान १३०० रुपये भाव तर कमाल १५०० रुपये भाव भेटत आहे.

३. केरळ राज्यातील कोलममध्ये कांद्याला प्रति क्विंटल किमान ४५०० रुपये भाव तर कमाल ४६०० रुपये भाव भेटत आहे.

४. केरळ राज्यातील कोट्टायममध्ये कांद्याला प्रति क्विंटल किमान ३५०० रुपये भाव तर कमाल ४००० रुपये भाव भेटत आहे.

English Summary: Onion growers in Maharashtra in crisis! However, in the states of Kerala and Bihar, the price of onion is higher, read more Published on: 17 May 2022, 06:55 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters