नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि येवला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा या सारखे पिकांना फाटा देत कांदा या नगदी पिकांना प्राधान्य दिले असून या दोन्ही तालुक्यांमध्ये या हंगामातप्रचंड प्रमाणातकांद्याची लागवड होत आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांची नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते.
यावर्षी शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आणि मका या पिकाचे क्षेत्र कमी केले असून मोठ्या प्रमाणात कांदा पिकाला प्राधान्य दिले आहे. खरे पाहायला गेले तर कांदा पीक हे खर्चिक आहे तसेच वातावरणीय बदलांना अतिसंवेदनशील असून देखील तसेच मजुरांची टंचाई सारखे समस्या आ वासून उभी आहे तरीसुद्धा शेतकरी कांदे लागवडीवर भर देताना दिसत आहेत. या वर्षी होत असलेल्या कांदा लागवडीचा विचार केला तर गेल्या दोन-तीन वर्षाचा विक्रम मोडीत काढत एक कांदा लागवड होत आहे.
मजुरांची टंचाई प्रमुख समस्या
कांदा लागवड करण्यासाठी भरपूर प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. त्यातच मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने मध्यप्रदेश येथील मजुरांनी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना आधार दिला आहे. शेतकऱ्यांनी चक्क मध्यप्रदेश राज्यातील शेंदवा परिसरातील मजुरांना आणून कांदा लागवड केली आहे.
मजुरांची टंचाई आहेच परंतु वातावरणात सातत्याने काही दिवसांपासून बदल होत असून दररोज धुक्याचे प्रमाण वाढल्याने कांद्याची मर होण्याची दाट शक्यता आहे. असेच जर वातावरण राहिले तर लागवड जरी कितीही वाढली तरी उत्पादन अपेक्षेपेक्षा फारच कमी येऊ शकते आणि उत्पादन खर्च देखील प्रचंड वाढ होऊ शकते.
Share your comments