महाराष्ट्र राज्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी नाफेड कडून कांदा खरेदीचा श्रीगणेशा झाला आहे. नाफेड कडून कांदा खरेदीला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याला चांगला दर मिळणार अशी आशा होती. मात्र आता ही शेतकऱ्यांची भोळी-भाबडी आशा फोल ठरताना दिसत आहे. कारण की नाफेड कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अतिशय कवडीमोल दरात कांदा खरेदी करीत आहे
नाफेडने यावर्षी संपूर्ण देशातून सुमारे अडीच लाख कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आहे. विशेष म्हणजे यापैकी सुमारे सव्वा दोन लाख टन कांदा एकट्या महाराष्ट्रातून खरेदी केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या नाफेडकडून 1000 रुपये ते बाराशे रुपये प्रति क्विंटल या दराने कांदा खरेदी केला जात आहे. यामुळे उत्पादन खर्च काढणे देखील शक्य नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे नाफेडच्या कांदा खरेदीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून आता कांदा उत्पादक संघटनेने आक्रमक पवित्रा अंगीकारला आहे.
कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने नाफेडकडे कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर देण्याची मागणी केली आहे याशिवाय कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 10 ते 12 रुपये प्रति किलो दराने नाफेडला कांदा विक्री करू नये असे आवाहन केले आहे.
Important News :
मोठी बातमी! या पद्धतीने e-KYC केली नाही तर PM Kisan चा 11 वा हफ्ता बँकेत जमा होणार नाही
मोठी बातमी! सोने तारण ठेऊन SBI देणार शेतकऱ्यांना 'एवढे' लोन
नाफेडच्या आश्वासनाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जर पाठिंबा दिला तर निश्चितच नाफेड कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुढे नमते घेईल आणि कांद्याच्या दरात वाढ करेल असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यामुळे आपोआप कांद्याच्या दरात वाढ होईल असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सांगितले. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सांगितले की या वेळी नाफेड वेगवेगळ्या जिल्ह्यात कांद्याला वेगवेगळा दर देत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे देखील संघटनेने स्पष्ट केले. नाफेडच्या या धोरणामुळे मात्र काही दलालांचा फायदा होत असल्याची गंभीर आरोप देखील यावेळी संघटनेने केला आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की नाफेडकडून धुळे आणि नाशिक जिल्ह्यात बाराशे रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची खरेदी होत आहे. अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांत याचं नाफेडकडून पावणे अकराशे रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी होतं आहे.
औरंगाबादेत 1 हजार रुपये प्रति क्विंटल या दराने कांद्याची खरेदी सुरु आहे. यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात नाफेड वेगवेगळ्या दरात कांदा खरेदी का करत आहे असा सवाल यावेळी शेतकरी देखील उपस्थित करीत आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने या दरात नांदेडला एक किलो कांदा देखील विकू नका असे आवाहन केले आहे. असं केलं तरच नाफेडकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल असे यावेळी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Share your comments