केंद्र सरकारने कांद्याबाबत रविवारी आणखी एक निर्णय घेतला आहे. कांद्याचा बफर स्टॉक तीन लाख टनांवरून पाच लाख टनांपर्यंत वाढवला आहे. तसंच हा कांदा NCCF मार्फत आजपासून २५ रुपये प्रति किलो दरानं कांदा विकण्यात येणार आहे. तर आता केंद्राने बफर स्टॉकमधून कांद्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे.
ज्या भागात किंवा राज्यांत किरकोळ किमती अखिल भारतीय सरासरीपेक्षा जास्त आहेत, अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये NCCF मार्फत कांदा विकण्यात येणार आहे. आजपर्यंत, बफरमधून सुमारे चौदाशे टन कांदा बाजारपेठेत पाठवले गेला आहे.
बफर स्टॉकमधून सुमारे १४०० टन कांदा बाजारापेठेत पाठवला आहे. एजन्सी आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा समावेश करून आगामी काळात कांद्याची किरकोळ विक्री योग्यरित्या वाढविली जाणार आहे.
दरम्यान, केंद्राने कांदा निर्यातशुल्क ४० टक्क्यांवर नेल्यामुळे कांदा उत्पादक संतापले आहेत. या निर्णयामुळे सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीत घट होणार आहे. यामुळे पुढील काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर घटण्याची भीती आहे. या निर्णयाविरोधात आणि निषेधार्थ आजपासून नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या लालसगावमधील बैठकीत हा घेतला आहे.
Share your comments