MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

बटाटा आणि कांद्याच्या किंमती वाढतच आहेत ,केवळ १३ दिवसांत १९ ते २० रुपये प्रति किलो भाव वाढले

बटाटा आणि कांद्याच्या वाढत्या किंमतींचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर झाला आहे. सातत्याने वाढ झाल्यानंतर अशी आशा होती की दिवाळी संपल्यानंतर किंमतीत थोडीशी घसरण होऊ शकते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra

बटाटा आणि कांद्याच्या वाढत्या किंमतींचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर झाला आहे. सातत्याने वाढ झाल्यानंतर अशी आशा होती की दिवाळी संपल्यानंतर किंमतीत थोडीशी घसरण होऊ शकते. परंतु त्यांच्या किंमतींमध्ये लक्षणीय घट झाली नाही. दिवाळीनंतरही बटाटा आणि कांद्याचे भाव कायम आहेत. ग्राहक व्यवहार विभागाला दिलेल्या किंमती अहवालानुसार मंगळवारी दिल्लीत बटाट्याचा किरकोळ दर प्रति किलो ४५ रुपये आणि कांदा ५५ रुपये प्रतिकिलो राहिला आहे.


कांद्याच्या भावाबद्दल सांगावे तर अहवालानुसार १७ ऑक्टोबरला कांद्याची किंमत ४३ रुपये प्रतिकिलो होती, १३ नोव्हेंबरला त्याची किंमत ६२ रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढली. गेल्या आठवड्यात ५६ रुपये प्रतिकिलो दराने आणि १७ नोव्हेंबरला ते ५५ रुपये प्रतिकिलो दराने विकले गेले. त्याच वेळी, १७ ऑक्टोबरला दिल्लीत बटाट्याची किंमत ४० रुपये प्रतिकिलो होती, जी १७ नोव्हेंबरला ४५ रुपये प्रति किलो झाली.


पीक खराब झाले यामुळे असे झाले असे मत , कृषी तज्ज्ञ बिनोद आनंद म्हणाले महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून खरीप कांदा यावेळी बाजारात येत असे. तथापि, या राज्यात मुसळधार पावसामुळे ४० टक्के पिकाचे नुकसान झाले आहे. साधारणत: नवरात्रीत कांद्याचा वापर कमी होतो, त्यामुळे दर कमी होतो, परंतु यावेळी केवळ घट कमी होण्याऐवजी वाढ नोंदवली गेली. अशा परिस्थितीत यावर्षी कांदा स्वस्त असणे कठीण आहे.

या भावात मंडईतून कांदा बाहेर येत आहे:नाशिकमधील लासलगाव बाजारातील आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठेचे सचिव वधवणे म्हणाले की, कांदा बाजारातून क्विंटल ४००० च्या दराने बाहेर येत आहे . त्याचवेळी आझादपूर मंडई बटाटा कांदा व्यापारी असोसिएशनचे (पीओएमए) सरचिटणीस राजेंद्र शर्मा म्हणाले की, दिल्लीच्या आझादपूर मंडीतील कांदा ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने, कांदा परदेशातून १८ ते २० रुपये किलोला येत आहे. कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार, सन २०१८-१९ मध्ये कांद्याचे उत्पादन २.२८ दशलक्ष टन होते, जे २०१९-२० मध्ये २.६७ दशलक्ष टन आहे .

English Summary: onion and potato price increasing day by day Published on: 18 November 2020, 11:56 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters