शेतकऱ्यांचा नेता म्हणून ज्यांची प्रचिती आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची नुकतीच IAS शेतकरीपुत्राने भेट घेतली. नेते राजू शेट्टी हे शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कायमच खंबीरतेने लढले आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांशी झगडणारं असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. राजकीय क्षेत्रात नेते राजू शेट्टी यांनी आपली अशी खास ओळख तयार केली आहे.
त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात शेतकरी तसेच शेतकरीपुत्र त्यांचा नेहमीच आदर करतात. नेते राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टवरुन IAS शेतकरीपुत्र ओंकार पवार याचे कौतुक केले आहे.फेसबुक पोस्टद्वारे ते म्हणाले, "पुणे येथे काल साखर आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी जात असताना पुणे रेल्वे स्टेशनजवळ माझी गाडी पाहून मला फोन आला. “साहेब मी साता-याहून IAS ओंकार पवार बोलतोय मला आपणांस भेटायचं आहे. यानंतर ओंकारची साखर आयुक्त कार्यालयात भेट झाली.
नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगात ओंकारने बाजी मारली आधी IPS व परत IAS या दोन्ही परिक्षा पास होणारा ओंकारला पाहिल्यानंतर मन भरून आले. कारणही तस होत ज्यावेळेस त्याने माझी भेट घेऊन आशिर्वाद घेत असताना तो म्हणाला कि साहेब माझे वडील चांगले शेतकरी आहेत व मी ही शेती करतच IAS झालो.
एकाच दिवशी,एकाच जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू; जिल्ह्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
यावेळी त्याचा पेढा भरवून सत्कार केला व ओंकारला सांगितले “ओंकार तु शेतक-यांना विसरू नकोस हिच माझ्यासाठी गुरु दक्षिणा असेल ! मला खात्री आहे शिवारात मशागत करणारा ओंकार निश्चीतच प्रशासनात सर्वसामान्य जनतेच्या सेवेच्या माध्यमातून आई वडीलांच्या संस्काराचे व स्वत:च्या कतृत्वाचे चांगले पिक आणेल". असा विश्वास राजू शेट्टींनी व्यक्त केला. नुकताच, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा-2021 चा अंतिम निकाल जाहीर झाला होता. त्यात ओंकार पवार यूपीएससी परीक्षेत चांगले यश मिळाले.
शेतकऱ्याच्या मुलाने कमावलेल्या या यशाबद्दल त्याचे अनेक स्तरावरून कौतुक होत होते. ओंकार पवार हा साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सनपाने गावात राहणार मुलगा आहे. गेली दोन वर्षे या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ओंकार प्रचंड मेहनत घेत होता. गावातच राहून त्याने आपली तयारी पूर्ण केली. ओंकारचे आई-वडील शेती करतात. अतिशय सामान्य कुटुंबातील ओंकारने आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर आपल्या शेतकरी आई वडिलांचे नाव मोठं केलं. त्यामुळे त्याचा सर्वांनाच अभिमान वाटत आहे.
महत्वाच्या बातम्या:
साखर उत्पादनात भारत देश जगात पहिल्या क्रमांकावर; तर 'या' राज्याने मारली बाजी
बापरे! नदीपात्रात आढळले वापरलेले कोरोना चाचणी कीट; दोषींवर कारवाईची मागणी
Share your comments