बापरे ! ऑगस्ट महिन्यात बँकेचे कामे होतील कमी; ९ दिवस बँका राहतील बंद

31 July 2020 07:38 AM


सध्या मागील चार महिन्यापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव फार जास्त प्रमाणात झाला आहे.   सगळे आर्थिक चक्र हे थांबून गेले होते, परंतु या अर्थ चक्राला गती देण्यासाठी सरकारने अनलॉक करून नियोजनात्मक पद्धतीने आर्थिक चक्र गतिमान करण्याचा प्रयत्न केला.   या अनलॉकमध्ये बँक पूर्णवेळ सुरू ठेवली जात आहे.  त्यामुळे बँका पूर्णवेळ सुरू झाल्यामुळे अनेकजण बँकेचे कामे पूर्ण करत आहे.  मात्र ऑगस्ट महिन्यात बँकांच्या कामांना ब्रेक लागणार आहे. पुढील महिन्यात तुमची बँकेची कामे उशिराने केली जातील. पुढील महिन्यात बँका बंद राहणार आहेत.

हो , याचे कारण आहे, ऑगस्ट महिन्यात नऊ दिवस बँका बंद असतील. येथे शनिवारपासून सुरू होत असलेल्या ऑगस्ट महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार? कोणत्या दिवशी बँका बंद राहणार? याची माहिती नागरिकांना असणे फार महत्त्वाचे आहे, बँक कोणत्या दिवशी बंद राहतील हे नागरिकांना समजल्यास नागरिक बँकेशी संबंधित कामे तात्काळ पूर्ण करून घेतील.  परिणामी खातेधारकांना होणारा मानसिक त्रास हा वाचेल     

या दिवशी बंद राहतील बँका

1 ऑगस्ट -शनिवार बकरी ईद

2 ऑगस्ट -रविवार

8 ऑगस्ट -दुसरा शनिवार

9ऑगस्ट -रविवार

15 ऑगस्ट -स्वातंत्र्य दिन

16ऑगस्ट -रविवार

22ऑगस्ट -शनिवार गणेश चतुर्थी

23ऑगस्ट -रविवार

30ऑगस्ट -रविवार

 तरी नागरिकांनी आपले महत्वाचे बँकेचे कामे या सुट्ट्यांच्या तारखा पाहून योग्य नियोजन करून आपली बँकेचे कामे करायची.

bank close bank holiday bank close in august बँका राहतील बंद बँक बँकेच्या सुट्ट्या ऑगस्ट महिना
English Summary: OHH my God ! nine days bank will close in august month 31 july

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.