
आता महाराष्ट्राच्या आंब्याची चव चाखणार जो बायडेन
प्रत्येक भारतीय फळांचा राजा असलेल्या आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी नेहमीच आतुर असतात. मात्र हे फळ केवळ देशापुरतं मर्यादित नसून याची मोठ्या प्रमाणावर परदेशातदेखील निर्यात होतं असते. परंतु, गेली दोन वर्षे कोरोनामुळे आंब्यासह इतर अनेक गोष्टींच्या निर्यातीवर पाबंदी करण्यात आली होती. कोरोनामुळे ठप्प झालेले जीवनमान आता सुरळीत होऊ लागल्याने आता आंब्याची अमेरिकेत होणारी निर्यातदेखील पूर्वव्रत झाली आहे.
या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंबे विक्री प्रदर्शनामध्ये आंब्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. आंब्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश असणारी एक पेटी थेट राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यापर्यंत पोहचवण्याचा आयोजकांनी प्रयत्न केला आहे. पुण्यातील रेनबो इंटरनॅशनल ही आंब्याची निर्यातदार कंपनी असून प्रतिवर्षी पाच प्रकारचे आंबे अमेरिकेत निर्यात करते.
यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील केसरी, हापूस, गोवा मानकूर या आंब्यांचा तर आंध्र प्रेदेशातील हिमायत आणि बैंगनपाली आदी आंब्यांचा समावेश आहे. रेनबो इंटरनॅशनलचे निर्देशक ए. सी. भासले यांनी आंबे व्हाइट हाऊसमध्ये पाठवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. द इंडियन एक्सप्रेसशी बोलतना त्यांनी ही माहिती दिली. तसेच या आंब्यांची निर्यात सोमवारी करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.
शेतकऱ्यांनो काळजी घ्या; 'या' जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस, NDRF टीम तैनात
बारामतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. रेनबो इंटरनॅशनल कंपनी बारामतीमधील आहे. त्यामुळे त्यांना झालेला द्विगुणित आनंद त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून व्यक्त केला. “जळोची, बारामती येथील रेनबो इंटरनॅशनल यांनी पाठविलेले आंबे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना देण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांना पाठविण्यात आलेल्या आंब्यामध्ये हापूस, केशर आणि गोवा मानकूर या आंब्याचा समावेश आहे,”
दिल्ली सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, जाहीर केले 'नागरी कृषी धोरण'
असं खासदार सुप्रियाताईनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पुढे त्या असंही म्हणाल्या, “महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले ही अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल रेनबो इंटरनॅशनल यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा.” मागील दोन वर्षे आंब्याची निर्यात बंद होती. मात्र आता आंब्यांची निर्यात पूर्ववत सुरु झाली आहे. सध्या अमेरिकेत हापूसला चांगली मागणी आहे असं निर्यातदार सांगतात.
महत्वाच्या बातम्या:
Baby Corn Cultivation: बेबी कॉर्न म्हणजे नेमके काय? कसे करतात त्याचे लागवड व फायदे? जाणून घेऊ सविस्तर
Share your comments