1. बातम्या

आता वाळू घरपोच मिळणार, सरकारच करणार ऑनलाइन विक्री

सध्या वादात अडकलेल्या वाळूसंबंधी राज्य सरकारने नवीन धोरण आखले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून अलीकडेच लोणी येथे झालेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेत हे धोरण तयार करण्यात आले आहे. याची घोषणा आज विधानसभेत केली जाणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
you will get sand at home

you will get sand at home

सध्या वादात अडकलेल्या वाळूसंबंधी राज्य सरकारने नवीन धोरण आखले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून अलीकडेच लोणी येथे झालेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेत हे धोरण तयार करण्यात आले आहे. याची घोषणा आज विधानसभेत केली जाणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली

ऑनलाइन नोंदणी आणि मागेल त्याला सरकारतर्फेच घरपोच वाळू पुरवठा करण्याचा या धोरणात समावेश असल्याचेही विखे पाटील म्हणाले. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर महसूलमंत्री पद मिळालेल्या विखे पाटील यांनी यासंबंधी नवे धोरण आखण्याचे ठरविले. त्यापूर्वीच्या सरकारमधील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात वाळू व्यावसायिकांना आणि त्यात अडकलेल्या सरकारी यंत्रणेला पाठीशी घालत असल्याचा आरोप विखे पाटील सतत करतात.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही यावरून थोरात यांच्यावर अनेकदा निशाणा साधला आहे. त्यातूनच हे चित्र बदलण्यासाठी नवे वाळू धोरण आखण्याची घोषणा मंत्री विखे पाटील यांनी केली. त्यानुसार कामही सुरू केले. गेल्या अनेक वर्षांपासून वाळू व्यवसाय विविध कारणांमुळे बदनाम झाला आहे. यातून सरकारी यंत्रणा आणि मंत्रीही वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची उदाहरणे आहेत.

रोपवाटिका व्यवसायात चांगली कमाई, अशा प्रकारे कमी खर्चात अधिक नफा मिळणार

कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारा हा व्यवसाय अधिकृतपत्रे अनधिकृतपणेच चालतो. आजपर्यंत त्याला शिस्त लावण्यासाठी अनेक प्रयोग झाले, नवे नियम करण्यात आले. मात्र, त्यातूनही पळवाटा शोधण्यात आल्या. या क्षेत्रात माफिया तयार झाले असून त्यांना राजाश्रय मिळत असल्याने गुन्हेगारीही वाढली आहे.

गाय आणि म्हशी कमी दूध देतात? मग या याकडे लक्ष द्या होईल फायदा..

त्यातून मिळणारा पैसा केवळ गुन्हेगारी नव्हे तर राजकारणासाठीही वापरला जात असल्याचा आरोप होतो. दरम्यान, पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

फक्त घोषणा झाली, पंचनामे कधी होणार? कृषीमंत्री सत्तारांच्या जिल्ह्यातच एकही पंचनामा नाही...
मारुतीचा ब्रेझा सीएनजीमध्ये लॉन्च, किंमत खूपच कमी, वाचा पूर्ण वैशिष्ट्ये
अवकाळीने पिके केली जमीनदोस्त, शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट

English Summary: Now you will get sand at home, the government will sell it online Published on: 20 March 2023, 11:49 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters