गरिबांना रेशन मिळविण्यासाठी रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागते. रेशन घेण्यासाठी खूप जास्त वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab Chief Minister Bhagwant Mann) यांनी आज थेट घरपोच रेशन पोचविण्याच्या योजनेला सुरूवात केली आहे. गरिबांना आता रेशन मिळविण्यासाठी रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागणार नाही.
आता नव्या नियमांमुळे लोकांना रांगेमध्ये उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही असे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले. राज्य सरकारचे अधिकारीच लाभार्थ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधतील आणि त्यांच्या उपलब्धतेनुसार त्यांना अन्नधान्य देण्यात येईल असे त्यांनी नमूद केले आहे.
हे ही वाचा :
ठाकरे सरकारने अखेर निर्णय घेतलाच!! शेतकऱ्यांना कोर्टकचेरीतून मोठा दिलासा..
सर्वसामान्यांना चटका! रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्य तेलाचे दर गगनाला
अर्थात ही योजना ऐच्छिक असेल. ही योजना पात्र लाभार्थीसाठी ऐच्छिक असेल असे मान यांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशामध्ये म्हटले आहे. या नावीन्यपूर्ण योजनेच्या अटी आणि शर्ती लवकरच जाहीर करण्यात येतील.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनीही भगवंत मान यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. अन्य राज्ये देखील आता पंजाबचे अनुकरण करतील. अन्य राज्यांतील नागरिकांनी देखील आम्हाला घरपोच रेशन देण्यात यावे अशी मागणी केली असल्याचे केजरीवाल यांनी नमूद केले .
Share your comments