1. बातम्या

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मोफत धान्य वितरण कार्यक्रमास मंजुरी

KJ Maharashtra
KJ Maharashtra
free grain distribution

free grain distribution

केंद्रीय मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर करण्याची औपचारिकता पूर्ण केली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, अंमलबजावणीच्या तारखेपासून त्याला मान्यता देण्यात आल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. पीएमजीकेएआय (PMGKY)-३ अंतर्गत अतिरिक्त धान्य वाटपासाठी दोन महिन्यांचा कालावधी मे-जून 2021 पर्यंत असेल.

कोरोना काळात थोडा दिलासा :

पंतप्रधान गरीब कल्याण अण्णा योजनेंतर्गत (PMGKY) मे-जून 2021 दरम्यान सुमारे 80 कोटी पीडीएस लाभार्थ्यांना दरमहा पाच किलो मोफत धान्य वाटप करण्याच्या कार्यक्रमास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ही योजना यापूर्वी अंमलात आली आहे. पीएमजीकेवायची पूर्वी 2020 मध्ये मे-जुलै पर्यंत तीन महिन्यांसाठी घोषणा करण्यात आली होती.कोविड -१९ चा गरिबांवर होणाऱ्या आर्थिक परिणामाची पाहणी करण्याची ही योजना नंतर नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती . कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेचा विचार करता अन्न मंत्रालयाने 1 मे 2021 पासून दोन महिन्यांसाठी पुन्हा ही योजना लागू केली आहे .

हेही वाचा:फक्त 2 लाख रुपये खर्च करून करा हा व्यवसाय दरमहा 50 हजार कमवा, सरकारसुद्धा मदत करेल

80 कोटी लाभार्थ्यांना 5 किलो धान्य मिळेल:

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरीसाठी औपचारिकता पूर्ण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, अंमलबजावणीच्या तारखेपासून त्याला मान्यता देण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. पीएमजीकेएआय -३ अंतर्गत अतिरिक्त अन्नधान्यांच्या वाटपासाठी दोन महिन्यांचा कालावधी मे ते जून 2021 पर्यंत असेल.या योजनेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (एनएफएसए) अंतर्गत येणाऱ्या सुमारे 79.88 कोटी लाभार्थ्यांना दरमहा पाच किलो धान्य दरमहा मोफत देण्यात येणार आहे. यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) अंतर्गत येणार्‍या लोकांचा देखील समावेश आहे.

केंद्र सरकारने असे म्हटले आहे की त्यातील अन्नधान्यांचा एकूण वापर सुमारे 80 दशलक्ष टन्स होऊ शकतो. यासाठी अंदाजे 25,332.92 कोटी रुपयांचे अन्न अनुदान द्यावे लागेल. सरकारच्या म्हणण्यानुसार या अतिरिक्त वाटपामुळे कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आर्थिक समस्यांमुळे गरीबांना होणाऱ्या अडचणींना त्वरित दिलासा मिळू शकेल.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters