1. बातम्या

आता व्हाट्सअपवर यूपीआय पेमेंट सर्विस; होईल पैशांचे ट्रांजेक्शन

KJ Staff
KJ Staff


सध्या सर्व गोष्टी ह्या डिजिटल झाल्या आहेत, सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत.अनेक सोशल मीडियाचे एप आता डिजिटल व्यवहाराकडे वळू लागले आहेत. यात आता व्हॉट्स अपने उडी घेतली आहे. आता व्हाट्सअप मधून तुम्ही आता आपल्या जवळच्य लोकांना पैसे पाठवू शकतात.यूपीआय पेमेंट सर्विस लाँच करण्यासाठी व्हाट्सअप ला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे.आता व्हाट्सअप युजर्स भारतात मनी ट्रान्सफर एकदम सुलभतेने करू शकतात. एका व्हाट्सअप वरून दुसऱ्या व्हाट्सअप युजर्सना यूपीआय  आयडी मध्ये पैसे पाठवू शकतात. यूपीआई कन्नड सर्विस लॉन्च करण्यासाठी व्हाट्सअपला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे.

व्हाट्सअप बराच दिवसांपासून यूपीआई सिस्टमचा अभ्यास करत होती. परंतु प्रायव्हसीचे फॅक्‍टरमुळे काय आठवण येत होते.  नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ने गुरुवारी व्हाट्सअपला स्वतःच्या अधिकृत व्हाट्सअप पे ला फेज वाईज दिली आहे. आताच्या वीस लाख युजर्स या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

व्हाट्सअपचे २०० मिलियन पेक्षा जास्त युजर्स

भारतामध्ये २०० मिल्लियन पेक्षा जास्त व्हाट्सअप यूजर्स आहेत. असं म्हटलं जात आहे की, व्हाट्सअप पे लॉंच झाल्‍यानंतर यूपीआई पेमेंट मार्केटमध्ये फोन पे, पेटीएम, गुगल पे आदींना कडवी टक्कर असेल.

    युपीआय म्हणजे काय?

यूपीआय एक रियल टाइम पेमेंट सिस्टम आहे. जे मोबाइल प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून बँक अकाउंट मधून पैसे पटकन ट्रान्सफर करू शकतात. यूपीआईच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला तुम्ही अनेक यूटीआय आपला लिंक करू शकतात. तसेच अनेक बँक अकाउंटला एक यूपीआई ॲप द्वारे संचालित करू शकता.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters