गेल्या एक ते दीड महिन्यापासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे महागाई गगनाला भिडू लागली आहे. कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा भासला असून पेट्रोल डिझेलचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. खाद्य तेलाचे दर देखील मोठे भडकले आहेत.
एवढेच नाही या युद्धाची झळ शेतीक्षेत्राला देखील सोसावी लागत आहे. युद्धामुळे आधीच रासायनिक खतांच्या किमती वाढतील असा तज्ञांनी अंदाज वर्तवला असताना आता कीटकनाशकांच्या देखील किमती गगनाला भिडू शकतील असा अंदाज कृषी क्षेत्रातील जाणकार लोक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
मेहनत केली पण वाया नाही गेली!! पुरंदरचे अंजीर युरोपात दाखल
आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना फक्त 6 हजारच नाही तर 36 हजार रुपये मिळतील; मात्र हे काम करावे लागेल
यामुळे शेतकरी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आगामी काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे त्यापूर्वी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी वर्तवलेला अंदाज निश्चितच शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होणारा आहे.
महागाईने कंबरडे मोडलेले असतानाच आता खतांच्या तसेच कीटकनाशकांच्या आणि बियाण्यांच्या किमती वाढल्याने शेतकरी राजा आणखीनच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मित्रांनो खत निर्मितीसाठी आवश्यक पोटॅश मोठ्या प्रमाणात रशिया या देशाकडून मागवला जातो. मात्र सध्या रशियाचे युक्रेनशी युद्ध सुरू असल्याने याच्या आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय दुसऱ्या देशांकडून देखील पोटॅशची आयात अपेक्षित असे झालेली नाही.
यामुळे खतांच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. या दरम्यान कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दावा केला आहे की, खतांच्या तुटवड्याचा फायदा उचलत काही कंपन्या लिकिंग पद्धतीने कीटकनाशकांची विक्री करतील तर काही कंपन्या कीटकनाशकांचे देखील भाव वाढवतील यामुळे निश्चितच याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
Share your comments