केंद्र आणि राज्य सरकारने अशी धोरणे तयार करावीत जेणेकरून कौशल्य विकास करता येईल, याबाबत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने एक सूचना जारी केली आहे. यामुळे देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच चांगली बातमी येऊ शकते. यामध्ये म्हटले आहे की, देशात काम करण्यासाठी लोकांची वयोमर्यादा वाढवावी. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे की, देशात निवृत्तीचे वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी. त्यासाठी समितीने आपला प्रस्तावही पाठवला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी येऊ शकते. तसेच ज्येष्ठ नागरिक सुरक्षा या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन देण्यात यावी. आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्था करण्याची शिफारस केली आहे.
तसेच या प्रयत्नात असंघटित क्षेत्रात राहणारे, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नाही अशांचाही समावेश व्हायला हवा, पण त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. तसेच 2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. म्हणजेच देशातील सुमारे 19.5 टक्के लोकसंख्या निवृत्तांच्या श्रेणीत जाईल. यामुळे यावर केंद्र सरकार यावर विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.
नाथाभाऊंनी करून दाखवले!! 50 एकरात खजुराचे दमदार उत्पादन..
भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे 10 टक्के किंवा 140 दशलक्ष लोक ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत आहेत. यामध्ये वाढच होणार आहे. यामुळे सध्या देशात निवृत्तीचे वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी. त्यासाठी समितीने आपला प्रस्तावही पाठवला आहे. यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
13 शेतकऱ्यांची क्रांती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंजिर खाणार भाव, शेतकरी होणार लखपती...
आता शेती परवडणार!! शेती परवडत नाही म्हणून पठ्ठ्याने बनवला ई-ट्रॅक्टर, एक तास चालवायचा खर्च फक्त 15 रुपये
महत्वाची बातमी! आता वाहतूक पोलिस वाहन चालकांना थांबवून तपासणी करु शकणार नाहीत, वाचा नवा नियम
Share your comments