राज्यात सध्या दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. दुधाच्या दरात पाच ते आठ रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात होती.
आता सरकारने यासाठी मोठी निर्णय घेतला आहे. यासंदर्भात दूध दर निश्चित करण्यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या समितीमध्ये सरकारी प्रतिनिधींसह खाजगी व सहकारी दूध प्रकल्पातील प्रतिनिधींची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच दूध उत्पादकांचे प्रतिनिधी देखील घेण्यात आले आहेत. ही कमिटी दर तीन महिन्यांनी वर्तमान स्थिती लक्षात घेऊन दुधाचे खरेदी दर निश्चित करणार आहे. यामुळे दरामध्ये समतोल राहील. तसेच शेतकऱ्यांना देखील याबाबत माहिती मिळेल.
अखेर पावसाने राज्याला भिजवले, राज्यभर पावसाला सुरुवात..
यामुळे सहकारी व खाजगी दूध संघाचा चालवण्याचा खर्च आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन हा निर्णय होणार आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला किमान दूध भाव मिळण्यासाठी व दुधाचे दर निश्चित करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे.
आता या प्रकारच्या समितीने तरी दूध उत्पादकांना न्याय द्यावा अशी दूध उत्पादकांची अपेक्षा आहे. शेतकरी याकडे लक्ष देऊन आहेत. येणाऱ्या काळात याबाबत शेतकरी आणि सरकार यामध्ये संघर्ष देखील होण्याची शक्यता आहे.
ट्रॅक्टर अनुदानापासून शेतकरी वंचीत, अनुदान रखडल्याने शेतकरी अडचणीत...
शेतकरी या प्रश्नावरून रस्त्यावर उतरले होते. या समितीत खाजगी दूध संघाच्या प्रतिनिधीमध्ये इंदापुरातील सोनाई दूध संघाचे प्रतिनिधी, चितळे डेअरी भिलवडी व ऊर्जा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या तीन प्रकल्पांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांच्यानंतर आता राज्यात बड्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर, राजकीय घडामोडींना वेग
मान्सूनचा वेग वाढला! आता राज्यात या ठिकाणी 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा...
विधानभवनातील आंदोलन प्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह 21 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता
Share your comments