1. सरकारी योजना

ट्रॅक्टर अनुदानापासून शेतकरी वंचीत, अनुदान रखडल्याने शेतकरी अडचणीत...

शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना ट्रॅकरची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. असे असताना आता कृषी विभागातर्फे राज्यातील शेतकर्‍यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेतंर्गत ट्रॅक्टर व अवजारांसाठी अनुदान दिले जाते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Farmers deprived of tractor subsidy (image google)

Farmers deprived of tractor subsidy (image google)

शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. असे असताना आता कृषी विभागातर्फे राज्यातील शेतकर्‍यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेतंर्गत ट्रॅक्टर व अवजारांसाठी अनुदान दिले जाते.

यासाठी शेतकर्‍यांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जातात. असे असताना मात्र अजूनही अनुदान आले नाही. अर्जांमधून सोडत पद्धतीने लाभार्थी शेतकर्‍यांची निवड केली जाते. याच योजनेतंर्गत किन्हीचे शेतकरी सचिन पोपट मोढवे यांना 27 एचपी ट्रॅक्टर सोडत पद्धतीने ऑगस्ट महिन्यात मंजूर झाला होता.

संबंधित शेतकर्‍याने कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदीही केला. सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संबंधित शेतकरी सचिन मोढवे यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, एकरी १० हजार रुपये, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ५ लाखांची मदत, केसीआर यांनी राज्यात रणशिंग फुंकले

परंतु या गोष्टीला दहा महिने होऊन ही कृषी विभागाकडून संबंधित शेतकर्‍याला एक लाखाचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. यामुळे याच्या प्रतीक्षेत ते आहेत.

तोतापूरी जातीच्या बकऱ्याला ८ लाखांची बोली, बकरी ईदमुळे मोठ्या प्रमाणात दर वाढले...

दरम्यान, कृषी विभागातर्फे शेतकर्‍यांना व्यक्तिगत लाभाच्या योजनेतून शेतीशी संबंधित यंत्र व अवजारांसाठी अनुदान दिले जाते. परंतु प्रत्यक्षात अनुदान शेतकर्‍यांना वेळेत न मिळाल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत.

काही दिवस टोमॅटो खाणं विसरा! आता टोमॅटो १२० रुपये किलोवर, पाऊस लांबल्याचा परिणाम..
पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून कशी काळजी घ्यावी? शेतकऱ्यांनो जाणून घ्या..
आता फक्त १ रुपयात मिळणार पीक विमा, अखेर सरकारने काढला आदेश..

English Summary: Farmers deprived of tractor subsidy, farmers in trouble due to stoppage of subsidy... Published on: 27 June 2023, 05:08 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters