वैयक्तिक आधार कार्डाप्रमाणे आता सगळ्या कुटुंबातील व्यक्तींचा डेटा एकाच स्मार्टकार्डमध्ये संकलित करण्याचा राज्य शासनाचा विचार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मंत्री विखे पाटील म्हणाले, की राज्यात महसूल विभागातील अनेक विषय प्रलंबित आहेत.Minister Vikhe Patil said that many issues in the revenue department are pending in the state.
शेतकऱ्यांची दिवाळीही पावसातच जाण्याची शक्यता, महाराष्ट्रावर घोंगावतंय चक्रीवादळाचे संकट
जमिनीची मोजणी आठ- आठ महिने होत नाही. तुकडेबंदी असली, तरी गुंठेवारीच्या माध्यमातून टोळ्या तयार झाल्या आहेत.तुकडेबंदी शिथिल करणार? - तुकडेबंदी शिथिल करण्याचा विचार सुरु आहे. मात्र, पाच-दहा गुंठे
जमिनीच्या तुकड्यांना परवानगी दिल्यास त्यातून अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. माफियागिरी वाढू शकते. सोयीनुसार प्लॉटचे तुकडे करून लोक ते विकून मोकळे होतील, पण प्लॉट घेतलेल्यांना रस्ते, वहिवाट कशी मिळणार, असे ते म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्याला एक 'रोव्हर' - फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी एका महिन्यात जमिनीची मोजणी होऊन मोजणी मागणाऱ्याच्या हातात त्याचा कागद देण्याचा नियम करणार आहोत. जमीन मोजणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रत्येक जिल्ह्याला एक 'रोव्हर' दिला जाईल, असे विखे म्हणाले.
Share your comments