आता गटविकास अधिकाऱ्यांना सिंचन विहीर मंजुरीचे अधिकार

17 March 2021 05:55 PM By: KJ Maharashtra
शेतकऱ्यांना विहिर मिळतील लवकर

शेतकऱ्यांना विहिर मिळतील लवकर

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सिंचन विहिरींच्या प्रशासकीय मंजुरीचे अधिकार आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ऐवजी गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, या निर्णयामुळे सिंचन विहिरींच्या योजनेच्या अंमलबजावणीला गती येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे..

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरी मंजुरीचे अधिकार जिल्हा परिषद ऐवजी पंचायत समितीला देण्यात यावेत अशी मागणी बऱ्याच दिवसापासून सातत्याने होत होती. जिल्हा परिषदेकडे सिंचन विहिरींच्या मंजुरीचे अधिकार असल्यामुळे कामात हवी तेवढी गती त्याच्या नव्हती त्यामुळे शेतकर्‍यांना लाभ होण्यासाठी विलंब होत होता.

 

याबाबत महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे आणि रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे सदर मागणी बरेच दिवसापासून केली होती.  त्यामुळे नियोजन विभागाने चार तारखेला शासन आदेश जारी करून याबाबतचा निर्णय घेतला.

 

या आदेशानुसार सिंचन विहिरी मंजुरीचे अधिकार आता गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत दरम्यान सिंचन विहीर मंजुरीच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे सिंचन विहीर प्रस्ताव मंजूर अशा कामाला गती प्राप्त होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

wells group development officers गटविकास अधिकारी विहीर मंजुरी जिल्हा परिषद Zilla Parishad
English Summary: Now the authority to sanction irrigation wells to group development officers

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.