1. बातम्या

आता जनावरांचा उपचार होणार आयुर्वेदिक औषधाने

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पशुवैद्यक शास्त्रात आयुर्वेदाचा वापर

पशुवैद्यक शास्त्रात आयुर्वेदाचा वापर

पशु वैद्यकीय शास्त्रामध्ये आयुर्वेदाचा वापर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यपालन, पशू संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत औषधी वनस्पती द्वारे पशुवैद्यकीय विज्ञानासाठी दर्जेदार औषधांचे नवीन संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

 

या सहकार्यामुळे पशु आरोग्य, पशुधन मालक समुदाय आणि समाजाच्या हितासाठी पशुवैद्यकीय क्षेत्रात आयुर्वेदाच्या वापरासाठी नियामक अशी यंत्रणा विकसित होण्यास मदत होईल असे आयुष् मंत्रालयाने म्हटले आहे. या उपक्रमाद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून संबंधित क्षेत्रात क्षमता वाढवणे तसेच शाश्वत आधारावर हर्बल पशुवैद्यकीय औषधांच्या विपणनाचे असलेल्या शक्यतांचा शोध घेणे आणि औषधी वनस्पतींची लागवड व त्यांचे संवर्धन यासारख्या सेवा प्रदान करणे इत्यादींचा समावेश आहे.

हेही वाचा : शेळ्यांचे गट वाटप करण्याची योजनेतून मिळेल शेळीपालनासाठी अनुदान

या पद्धतीने हर्बल पशुवैद्यकीय शैक्षणिक कार्यक्रम विकसित करण्यास त्याबरोबरच दुग्ध उत्पादन शेतकरी आणि कृषी शेतकरी यांच्यात हरबल पशुवैद्यकीय औषधांचे महत्त्व आणि त्यांचा वापर आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीबाबत जागृतता वाढवण्यात लागवडी बाबत जागरूकता वाढविण्यात मदत होणार असल्याचा आयुष मंत्रालयाचा दावा आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters