केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी कायमच वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण योजना कार्यान्वित करत असते. केंद्राप्रमाणे अनेक राज्य सरकारे आपल्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना अमलात आणून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत असतात. झारखंड सरकारने देखील आपल्या राज्यातील नागरिकांसाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना सवलत प्राप्त करून देण्यासाठी अशीच एक नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित केली आहे
झारखंड राज्यातील रेशन कार्डधारक नागरिकांसाठी झारखंड सरकारने एक विशिष्ट सुविधा प्रदान केली आहे, झारखंड सरकारने त्यांच्या राज्यातील नागरिकांची रेशन घेण्यासाठी फरफट होऊ नये यासाठी एटीएम द्वारे रेशन वितरित करण्याची योजना हाती घेतली आहे. आता झारखंड राज्यातील नागरिकांना एटीएम मार्फत रेशन मिळवता येणे शक्य होणार आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, झारखंड सरकार प्रायोगिक तत्त्वावर राज्यात दहा ठिकाणी धान्याचे एटीएम सुरू करणार आहे. या ग्रेन एटीएम मशीन द्वारे झारखंड राज्यातील रेशनकार्डधारकांना रेशन देऊ करण्याची सरकारची योजना आहे. यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सरकार मल्टी कमोडिटी ऑटोमॅटिक मशीन उभारण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे.
कोणत्या दुकानाला दिले जाणार धान्याचे एटीएम मशीन?
या संदर्भात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाचे संचालक दिलीप तिर्की सांगतात की, धान्य एटीएम पुरवठा, स्थापित, देखरेख आणि ऑपरेट करण्यासाठी ते राज्यातील सर्वोत्तम एजन्सी शोधत आहेत. यासाठी सरकारने इच्छुक पार्टीला त्यांचे प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली होती. सरकारने अर्ज मागवण्याची तारीख 23 मार्चपर्यंत ठेवली आहे.
याशिवाय, एजन्सीला अंतिम रूप देण्यासाठी किमान दोन निविदाकारांनी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. सर्व काही सुरळीत राहिल्यास काही महिन्यांत झारखंड राज्यात धान्याची एटीएम मशीन कार्यान्वित होईल, असेही दिलीप तिर्की म्हणाले. प्रथम, ज्यांच्याकडे अन्न साठवणूक गोदामे आणि उच्च थ्रूपुट पीडीएस दुकाने आहेत त्यांना धान्य एटीएम मशीन दिले जातील. असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
गुडगावमध्ये पहिले धान्य एटीएम मशीन स्थापित झाल
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, गतवर्षी गुडगाव हे या योजनेचा अवलंब करणारे देशातील पहिला जिल्हा म्हणून घोषित केले गेले, सध्या युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रॅमद्वारे चालवण्यात येणार्या अन्नपूर्ती नावाची स्वयंचलित फूड डिस्पेंसर योजनापासून यासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, गुडगावमध्ये बसवण्यात आलेल्या ग्रेन एटीएम मशीनमध्ये 8-10 मिनिटांत 70-80 किलो धान्य मिळते.
धान्य एटीएम मशीनमधून रेशन कसे मिळणार
धान्य एटीएम मशीनमधून रेशन घेण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक किंवा शिधापत्रिका क्रमांक रेशन दुकानावर नोंदवावा लागेल. ज्या अंतर्गत या प्रकल्पाचा लाभ संबंधित रेशन कार्ड धारकाला मिळेल. असे सांगितले जात आहे की, स्वयंचलित धान्य/मल्टी-कमोडिटी एटीएम बायोमेट्रिक प्रणालीशी जोडले जातील. जे की टच स्क्रीनने चालवता येणे शक्य होईल.
संबंधित बातम्या:-
खरं काय! मोदी सरकार कृषी कायदे मागच्या दाराने का होईना लागू करेलच; सीताराम येचुरी यांचा गंभीर आरोप
बियाण्यावर बिजप्रक्रिया का करावी? जाणुन घ्या याविषयी काही महत्वाची माहिती
मक्याचा आडोसा घेऊन 'या' शेतकऱ्याने केलं असं काही विपरीत की पोलिसांनी टाकला छापा आणि……!
Share your comments