1. बातम्या

सांगली द्राक्ष बागायतदारांची एकी, स्वतः ठरवणार द्राक्ष दरनिश्चिती धोरण

मागच्या काही दिवसांपूर्वी द्राक्ष दराची निश्चियती आणि अंमलबजावणीची सुरुवात नाशिक जिल्ह्यात झाली होती. आता हे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत आहे. नाशिकच्या सोबतच आता सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार यांची एक बैठक पार पडली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
grape

grape

मागच्या काही दिवसांपूर्वी द्राक्ष दराची निश्‍चिती आणि अंमलबजावणीची सुरुवात नाशिक जिल्ह्यात झाली होती. आता हे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत आहे. नाशिकच्या सोबतच आता सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार यांची एक बैठक पार पडली.

यामध्ये स्वतः द्राक्ष बागायतदारांनी द्राक्षांचे आणि बेदाण्याचे तर निश्चित केले आहेत.हेदरनिश्चिती धोरण ठरवतांना द्राक्षाच्या उत्पादनखर्चावर दहा टक्के नफा आखून हे दर ठरविण्यात आले आहेत. तसेच बेदाण्याच्या विक्रीसाठी बाजारपेठ महत्त्वाच्या असून याकरिता रेझीमची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात नाशिक येथे अशीच द्राक्ष दर निश्चिती बाबत  नाशिक जिल्हा द्राक्ष बागायतदारांच्या बैठक पार पडली होती. यामध्ये द्राक्षाचे दर ठरवताना घेतलेल्या उत्पादनावर किती खर्च झाला त्यानुसार दहा टक्के नफा मिळावा हा उद्देश ठेवून द्राक्षाचे दर ठरविण्यात आले होते. या बैठकीमध्ये 35 ते 55 रुपये प्रतिकिलो हा दर द्राक्षासाठी ठरविण्यात आला आहे तर बेदाण्यासाठी त्याच्या प्रतवारीनुसार 80 ते 250 असा दर ठरवण्यात आला आहे.

 या बैठकीत झालेले महत्वाचे निर्णय

 या बैठकीत निर्यात करण्यात येणाऱ्या तासाला 85 रुपये किलो तर स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी असलेला सुपर सोनाका या वानाच्या द्राक्षासाठी पन्नास रुपये प्रति किलो तर अनुष्का 55 रुपये प्रति किलो, माणिक चमन चाळीस रुपये प्रति किलो वथॉमसन35 रुपये किलो असे दर ठरलेले आहेत तसेच बेदाण्याला प्रतवारीनुसार सर्वाधिक दर 250 तर डागाळलेल्या बेदाण्यासाठी 80 रुपये किलो असे दर ठरविण्यात आले आहेत. 

यामध्ये जे ठरले आहे त्याचे कडेकोट पालन करायचे तसेच कोणीही ठरलेले नियम मोडायचे नाहीत.तसेच ओळखपत्र पाहूनच दलालाला द्राक्ष विक्री करायची त्यासोबतच बेदाणा च्या मार्केट साठी नवनवीन कल्पना पुढे मांडण्यात याव्यात तसेच बेदाण्याचा समावेश शालेय पोषण आहारात करण्यात यावा असे निर्णय बैठकीत झाले आहेत.(संदर्भ-tv9 मराठी)

English Summary: now grape productive farmer dicide grape rate in sangli district Published on: 07 January 2022, 05:38 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters