1. बातम्या

दिलासादायक निर्णय! आता दीड लाख शेतकऱ्यांना मिळणार प्री-पेड मीटर

मागील बऱ्याच दिवसांपासून कृषिपंपांचा वीजपुरवठा विषयीबराच वाद झाला.यामध्ये वीजपुरवठा खंडित तेसदोष वीज बिलयामुळे महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण तयार झाले होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
now get pre paid electric meter to one lakh fifty thousand farmer in state

now get pre paid electric meter to one lakh fifty thousand farmer in state

मागील बऱ्याच दिवसांपासून कृषिपंपांचा वीजपुरवठा विषयीबराच वाद झाला.यामध्ये वीजपुरवठा खंडित तेसदोष वीज बिलयामुळे महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण तयार झाले होते.

त्यासाठी महावितरणला सदोष बिल दुरुस्तीसाठी मोहीम राबवावी लागली. आता या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार कृषी वाहिन्यांचे ऊर्जा अंकेक्षण करण्यासाठी उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीज जोडणी दिलेल्या कृषी ग्राहकांना म्हणजे शेतकऱ्यांना प्रीपेड मीटर बसविण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे.  याअंतर्गत जवळ जवळ दीड लाख कृषी ग्राहकांनाप्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

महावितरण प्रति वर्षी आठ ते नऊ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करते. त्यासोबतच नादुरुस्त व इतर कारणांमुळे सध्या अस्तित्वात असलेले मिटर बदलण्यासाठी महावितरणला प्रति महिना दोन लाखसाध्या म्हणजेच प्रीपेड नसलेल्या मीटरची आवश्यकता भासते.

चालू स्थितीमध्ये 22 एप्रिल पर्यंत महावितरणाचा क्षत्रिय कार्यालयामध्ये 121802 मीटर उपलब्ध आहेत. त्यामध्ये नवीन वीज मीटर च्या उपलब्धतेमध्ये आणखी वाढ करण्यासाठी येणाऱ्या सप्टेंबरपर्यंत तब्बल पंधरा लाख नवीन वीज मीटर चा पुरवठा करण्याचा आदेश पुरवठादारांना देण्यात आला आहे.

यानुसार आता 30 एप्रिल पर्यंत 1 लाख आणि मे महिन्यात दोन लाख नवीन वीज मीटर उपलब्ध होतील. तसेच जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीमध्येप्रत्येक महिन्याला तीन लाख 27 हजार पाचशे मीटर उपलब्ध होणार आहेत. तसेच याशिवाय दहा लाख स्मार्ट मीटरची खरेदी ची निविदा प्रक्रिया देखील सुरू आहे. दीड लाख थ्री फेज मीटर घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या थ्री फेज मीटर चा पुरवठा मे अखेरपर्यंत होणार आहे. (स्त्रोत-सकाळ)

महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:अखेर पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पैसे जमा..

नक्की वाचा:दारिद्रय रेषेखाली शेतमजुरांसाठी राज्यात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना, पाहा तुम्ही आहात काय या योजनेसाठी पात्र

नक्की वाचा:टोमॅटो उत्पादकांसाठी महत्त्वाचे! पिवळा पर्णगुच्छ रोग आहे टोमॅटोवरील सर्वात नुकसानकारक, योग्य व्यवस्थापन गरजेचे

English Summary: now get pre paid electric meter to one lakh fifty thousand farmer in state Published on: 25 April 2022, 12:16 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters