1. सरकारी योजना

दारिद्रय रेषेखाली शेतमजुरांसाठी राज्यात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, पाहा तुम्ही आहात काय या योजनेसाठी पात्र

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील भूमिहीन शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविण्यात येणार आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण या योजनेअंतर्गत शासनाकडून जमीन खरेदी करून ती जमीन भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील कुटुंबातील पती पत्नीच्या नवे केली जाते.

किरण भेकणे
किरण भेकणे
Empowerment

Empowerment

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील भूमिहीन शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण  योजना राबविण्यात येणार आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण या योजनेअंतर्गत शासनाकडून जमीन खरेदी करून ती  जमीन  भूमिहीन  अनुसूचित  जाती  व  नवबौद्ध प्रवर्गातील कुटुंबातील पती पत्नीच्या नवे केली जाते.

चार एकर कोरडवाहू तर दोन एकर बागायती शेतीसाठी दिले जाणार सरकारकडून अनुदान :-

या प्रवर्गातील भूमिहीन शेतकरी दारिद्रयरेषेखाली असेल तर त्याच्या कुटुंबाला चार एकर कोरडवाहू तसेच दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाकडून जमीन खरेदी  करण्यासाठी येणाऱ्या एकूण  खर्चापैकी  ५० टक्के रक्कम ही बिनव्याजी कर्ज स्वरूपात तर  ५०  टक्के रक्कम  ही  अनुदान  स्वरूपात दिली  जाणार आहे चार  एकर  कोरडवाहू शेतजमिनीसाठी सरकारकडून वीस लाख रुपये तर २ एकर बागायती शेतजमिनी खरेदी करण्यासाठी सोळा लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती समजलेली आहे.


योजनेच्या अटी :-

१. या योजनेच लाभ घेणारा लाभार्थी १८ ते ६० वर्षाचा असावा.
२. लाभार्थी हा दारिद्रयरेषेनखाली शेतमजुर असावा.
३. या योजमेचा लाभ घेण्यासाठी परित्यक्ता, विधवा याना प्राधान्य आहे.
४. महसूल व वन विभागाने ज्या कुटुंबांना गायरान व सिलिंग जमिनीचे वाटप केले आहे त्या कुटुंबांना या योजनेच लाभ घेता येणार नाही.
५. कर्ज मंजुरी झाल्यानंतर दोन वर्षाने कर्जफेड सुरुवात होणार आहे.
६. कुटुंबाने दिलेल्या कालावधीत कर्जफेड करणे आवश्यक आहे.
७. लाभार्थ्याने स्वतः जमीन करणे आवशयक आहे तसा करारनामा देणे आवश्यक आहे.
८. जमीन खरेदी करतेवेळी प्रति एकर तीन लाख रुपये एवढी मर्यादा राखण्याची मुभा जिल्हास्तरीय समितीस देण्यात आलेली आहे.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे :-

१. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
२. अर्जदाराचा अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्याने दिलेले विहित प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, निवडणूक कार्ड प्रत, भूमिहीन शेतमजूर असल्याचा तहसीलदाराने दिलेला दाखला.
३. मागील वर्षाचा तहसीलदारांनी वार्षिक उत्पन्नाचा दिलेला दाखला.
४. ६० वर्षखाली वय असलेला दाखला व पुरावा.
५. अर्जदार हा दारिद्र्यरेषेखाली असलेले प्रमाणपत्र.
६. शेतजमीन पसंदीबाबत अर्जदाराचे १०० च्या स्टॅम्पवरील प्रतिज्ञापत्र.
७. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज विहित नमुन्यामध्ये १८ नोव्हेंबर २०१७ पर्यंत सहायक आयुक्त तसेच समाज कल्याण कार्यालयात सादर करावा.
८. संकलन-जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा.

English Summary: Karmaveer Dadasaheb Gaikwad Empowerment and Swabhiman Yojana in the state for agricultural laborers below the poverty line, see if you are eligible for this scheme Published on: 23 April 2022, 02:29 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters