मे महिना संपत आला तरी शेतकऱ्यांसमोर अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहेच. याबाबत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने चालू रहातील यांसारखे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणी यंत्र मराठवाड्यातदेखील दाखल झालेले आहेत. असं असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना चांगलंच हैराण केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील लातूर, परभणी, जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणी यंत्र मराठवाड्यात हजर असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना घेता येत नाहीये. पावसामुळे ऊसतोडणीची यंत्रे उसाच्या फडातही जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. परिणामी हे यंत्र आता पावसामुळे बंद ठेवावी लागली आहेत.
यंदा राज्यात अतिरिक्त उसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अतिरिक्त ऊसामुळे ऊस पेटवून देणे, आत्महत्येसारख्या अनेक दुर्घटना घडल्या. यावर तोडगा म्हणून अनेक उपाय समोर आले. शेवटी मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोडणीची यंत्रे मराठवाडा क्षेत्राकडे पाठवून देण्यात आले. त्यामुळे आता हा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागेल असं शेतकऱ्यांना वाटू लागले.
मात्र या दोन दिवसांमध्ये लातूर जिल्ह्यातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा नदीकाठच्या परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. परिणामी ऊसतोडणीची यंत्रे शेतात जाणेही मुश्किल होऊन बसले आहे. उसाच्या गाड्या फडातच अडकत असल्याने तोडणीसाठी अडथळा निर्माण होत आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कितीतरी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
PM Kisan Samman Nidhi: 11 व्या हप्त्यासाठी, लाभार्थी यादीतील नाव "या" प्रमाणे तपासा
जरी यावेळेस हंगाम लांबला असला तरी जोपर्यंत संपूर्ण उसाचे गाळप होत नाही तोपर्यंत धुराडी बंद करु नये असा आदेशच साखर आयुक्त यांनी कारखाना प्रशासनाला दिला आहे. मे महिन्याच्या अखेरीस ऊसतोड पूर्ण होईल या अनुशंगाने साखर आयुक्त प्रशासनाने हे नियोजन केले होते. मात्र पावसाने या प्रशासनाच्या संपूर्ण नियोजनावर पाणी फेरले आहे.
महत्वाच्या बातम्या:
7th Pay Commission: 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग येणार की नाही? जाणून घ्या अपडेट
Share your comments