ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असून नैसर्गिक आपत्तीमुळे जी काही नुकसान भरपाई होते ती अचूकपणे मिळणे तसेच, पीक कर्ज वाटप व पिक विमा दावे निकाली काढण्यासाठी खूप आवश्यक असणार आहे. परंतु आपल्याला माहित आहेच की, ई पीक पाहणी नोंदणी करताना शेतकऱ्यांना मागच्या वर्षी खूप प्रकारच्या अडचणी आल्या होत्या. त्यासाठी आता ई पीक पाहणी मोबाईल ॲप सुधारित आवृत्ती 2 गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध असून शेतकऱ्यांना आता पीक पाहणी नोंदणी करता येणार आहे.
कसे आहे आत्ताचे सुधारित ॲप?
मागच्या वर्षी ॲप मध्ये जा काही समस्या होत्या त्यामध्ये बऱ्याच सुधारणा करून आता नवीन सुविधा युक्त ॲप सुरू करण्यात आले आहे.
यामध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून शेतकरी यामुळे पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील त्यावेळी फोटो घेण्याचा ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदू पर्यंतचे अंतर आज्ञावली मध्ये आता दिसणार आहे.
जर शेतकरी पीक पाहणीसाठी जो काही गट निवडणार त्यापासून दूर असले तर त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल ॲप मध्ये दर्शवण्यात येणार असल्यामुळे आता पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हें निर्धारीत होणार आहे.
शेतकरी या इ पिक पाहणी मध्ये जे काही पिकाची नोंदणी करतील त्याबाबत आज्ञावली मध्ये स्वयंघोषणापत्र देखील घेतले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पीक पाहणी ही स्वयप्रमाणित मानण्यात येऊन ते गाव नमुना क्रमांक 12 मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
नक्की वाचा:PM Suraksha Bima Yojana: महिन्याला फक्त 1 रुपया जमा करा; सरकार देतंय 2 लाखांचा लाभ
शेतकरी जी काही पिक पाहणी करतील त्यापैकी 10 टक्के पाणी ची पडताळणी तलाठ्यामार्फत करण्यात येणार असून तलाठी यांनी केलेल्या पडताळणीनंतर आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्यांना
सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना क्रमांक 12 मध्ये प्रतिबिंबित होतील. मागच्या वर्षी ज्या काही अडचणी येत होत्या त्या सोडवण्यासाठी आत्ता या नवीन सुधारित ॲपमध्ये हेल्प अर्थात मदत हे बटन दिले असून यावर क्लिक केल्यास तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यांना उत्तरे देण्यात आलेली आहेत.
नक्की वाचा:आता उसातही काटामारी! 4581 कोटींचा घोटाळा, राज्यात खळबळ..
Share your comments