बाजारपेठेमध्ये बऱ्याचदा आवश्यक वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते व त्यामुळे संबंधित वस्तूंची भाववाढ होते व सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. ही गोष्ट प्रामुख्याने शेती उत्पादनाच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामध्ये जर आपण विविध प्रकारच्या डाळींचा विचार केला तर त्यांचा साठा करून बाजारपेठेत कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते व भाववाढ होते.
परंतु आता डाळींच्या दरावर केंद्र आता लक्ष ठेवणार असून साठेधारकांना आता तूर डाळीच्या साठी बाबत माहिती उघड करणे सक्तीचे असल्याचे देखील सरकारने म्हटले आहे.
नक्की वाचा:Vegetable Market: पाऊस आला भाजीपाल्याचे नुकसान करून गेला,भाजीपाल्याचे दर कडाडले
अशा प्रकारचे निर्देश केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना दिले आहेत. साठेधारकांना तूरडाळीच्या सध्याची माहिती ऑनलाईन मॉनिटरिंग पोर्टलवर देण्याचे देखील केंद्र सरकारने सांगितले आहे.
काय आहेत केंद्र सरकारचे निर्देश?
केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना निर्देश देताना म्हटले आहे की, साठेधारकांना सक्तीने तूर डाळीचा साठा उघड करायला सांगितले आहे. तूर डाळीचा साठा किती आहे यावर बारकाईने लक्ष ठेवायला आणि त्याबाबतची सत्यता देतील तपासायला सांगितले आहे.
नक्की वाचा:सुवर्णसंधी! सोने मिळतंय 3700 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर...
तसेच संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ज्या काही साठेदार कंपन्या आहेत त्यांना त्यांच्याकडील डाळीच्या साठ्याबद्दलची माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या वेबसाईटवर प्रत्येक आठवड्याच्या शेवटी उपलब्ध करण्यास सांगावे असा देखील सल्ला दिला आहे.
कारण यामध्ये काही साठेधारक व व्यापारी बाजारांमध्ये डाळींचे दर वाढावेत यासाठी डाळींची विक्री थांबवून त्यांचा साठा करत असून कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचे अहवाल मिळाल्यानंतर केंद्र सरकारने या सूचना दिल्या आहेत.
Share your comments