कृषिप्रधान देश म्हणून आपल्या देशाची जगभरात ओळख आहे. सध्या देशातील पीक पद्धती मध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत याचे कारण फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब यामुळे शक्य झाले आहे. आजकाल शेतकरी कमी काळात जास्त उत्पन्न घेत आहेत हे फक्त तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात आपल्या 5G इंटरनेट सेवेची चाचणी सुरू झाली होती परंतु काल पासून संपूर्ण देशात 5G इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. आता या 5G इंटरनेट सेवेमुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे दिसत आहे. 5G इंटरनेट च्या मदतीने आता शेतकरी बांधव स्मार्ट शेतीच्या वाटेला लागला आहे.
शेतकरी आणि तंत्रज्ञान:-
आजकाल शेती पारंपरिक आणि आधुनिक पदधतीने केली जाते. तसेच शेतीमध्ये दिवसेंदिवस अमुलाग्र बदल घडून येताना आपल्याला दिसत आहेत. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रासायनिक खते यामुळे शेतकरी वर्गाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच आता शेतीसाठी ड्रोन आणि एआई तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. 5G नेटवर्कमुळे ड्रोनची व्याप्ती वाढवणे सोपे होईल. त्याचबरोबर एआय तंत्रज्ञानासह प्रयोगशाळा तयार केल्या जातील जिथे 5G सेन्सर च्या मदतीने शेतकरी सुरक्षित शेती करू शकतील.
हेही वाचा:-लिचीची शेती करून कमवू शकता बक्कळ पैसा, जाणून घ्या लीची शेतीचे व्यवस्थापन आणि लागवड.
5G फॉर एग्रीकल्चर मार्केटिंग:-
शेतकरी बांधवांना तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी आणि त्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अनेक मोबाईल ची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲप्सच्या मदतीने शेतकरी आआता घरबसल्या अनेक वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. या ॲप च्या द्वारे बियाणांची होम डिलिव्हरी, पिकांची खरेदी विक्री, जनावरे खरेदी विक्री या गोष्टीं अगदी सहज करता येणार आहेत हे सगळे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शेतकऱ्यांना चांगला नेटवर्क स्पीड मिळतो. आणि देशात 5G नेटवर्क आल्यामुळे शेतकऱ्यांचे एग्रीकल्चर मार्केटिंग आता सोपे होईल.
हेही वाचा:-जिना चढताना, धावताना लागतोय थकवा! स्टॅमिना वाढवण्यासाठी हे ५ पदार्थ खाणे आहे फायदेशीर
हवामान अंदाजासाठी होईल 5G नेटवर्कचा उपयोग:-
देशातील शेती ही पूर्णणे हवामानावर अवलंबून असते जर का पाऊस पडला तरच शेतकरी शेती करू शकतो. बऱ्याच वेळा बदलत्या वातावरणामुळे आणि हवामानामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यात काही वेळा हवामानाचा अंदाज सुद्धा खोटा ठरत आहे आता 5G इंटरनेट च्या मदतीने सेन्सर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी वर्गाला अचूक हवामान अपडेट मिळू शकतात.
Share your comments