सध्या साखर कारखानदारी खूपच चाचणीत आली आहे. यामुळे कारखाने चालवणे अवघड झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे. यंदा तर उसाचे उत्पादन वाढल्याने यंदा अनेकांचे ऊस शेतातच राहिले, तर अनेक शेतकऱ्यांनी जास्तीचे पैस देऊन ऊस तोडला. अनेकांच्या उसाच्या वजनात मोठी घट झाली. अनेक कारखाने हे मे पर्यंत सुरु होते.
सध्या राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आहेत. यामध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे , बबनराव पाचपुते, कल्याणराव काळे यांच्या कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. साखर आयुक्तांचा राज्यभरातील सात साखर कारखान्यांना दणका दिला असल्याची माहिती मिळाली आहे. या कारखान्यानी रक्कम थकवली आहे.
यामध्ये 70 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण 14503.59 लाख आरआरसी रक्कम थकवली असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे. सोलापूर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर – आरआरसी रक्कम 3674.90 लाख (संबंधित राजकीय नेते – कल्याणराव काळे. पुणे- राजगड सहकारी साखर कारखाना लिं. भोर- आरआरसी रक्कम 2591.69 लाख (संबंधित राजकीय नेते – आमदार संग्राम थोपटे
बीड – आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना, आंबेजोगाई, -आरआरसी रक्कम 814.15 माजी मंत्री धनंजय मुंडे. बीड – वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी – आरआरसीसी रक्कम – 4615.75 लाख माजी मंत्री पंकजा मुंडे. सातारा – किसनवीर ससाका भुईंज, सातारा – आरआरसी रक्कम – 411.91 लाख ( आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. अहमदनगर – साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, अहमदनगर – आरआरसी रक्कम -2054.50 लाख – आमदार बबनराव पाचपुते, भाजप.
महत्वाच्या बातम्या;
दोन कोटींहून जास्त रेशनकार्ड रद्द, मोदी सरकारच्या मोठा निर्णय..
ब्रेकिंग! सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का, 'या' जागांवर होणार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका
श्रीलंकेनंतर आता इराक, आंदोलकांचा संसदेवर ताबा, देशातील परिस्थिती हाताबाहेर..
Share your comments