1. बातम्या

शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नोगा ब्रँडची मूल्य साखळी आवश्यक – कृषीमंत्री

KJ Maharashtra
KJ Maharashtra

महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक गटांचा उत्पादित भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याकरिता नोगा ब्रँड खाली मूल्य साखळी विकसित करण्यावर भर द्यावा, तसेच शहरी भागातील रहदारीच्या ठिकाणी आणि महामंडळांच्या मालकी असलेल्या जागांवर नोगा  उत्पादनांची विक्री स्थळ उभारावेत अशा प्रकारचे निर्देश महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळाच्या कामांचा आढावा बैठक कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तेव्हा बोलताना त्यांनी कृषी उद्योग महामंडळाने विठ्ठल केपीकेड या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवून लोकाभिमुख व्हावे.

अशा प्रकारचे आव्हान श्री. भुसे यांनी केले. तसेच महामंडळाच्या इतर लेखाविषयक बाबींचा आढावा घेत असतानाच पारंपारिक रासायनिक खते व कीटकनाशके तसेच कृषी अवजारे सोबतच नावीन्यपूर्ण उत्पादने, ट्रायकोडर्मा, फेरोमन सापळे यांचे उत्पादन करून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा अशी सूचना श्री. भुसे  यांनी केली.

 माहिती स्त्रोत- महासंवाद

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters