राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे हे जवळपास ५० आमदारांना घेऊन गुवाहाटी येथे गेले होते. विधान परिषदेची निवडणूक झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आणखी काही आमदारांनी बंडखोरी केल्याचे वृत्त धडकले आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक गोष्टी घडल्या.
मुंबईतुन सूरत आणि मग सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीला रवाना झाले. गुवाहाटीमधील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये सर्व बंडखोर आमदारांची सोय करण्यात आली होती. या हॉटेलमध्ये जवळपास ७० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. या हॉटेलमध्ये या सर्व आमदारांनी जवळपास ७ दिवस मुक्काम केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यानंतर बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेल सोडून गोव्यातील दोनापावला येथील ताज कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी दाखल झाले.
रॅडिसन ब्ल्यूमधील हॉटेलचे बिल एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी भरले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंनी किमान ६८ ते ७० लाख रुपये इतकी रक्कम हॉटेलचे भाडे म्हणून चुकती केली. शिंदे गटाच्या मुक्कामासाठी हॉटेलच्या विविध मजल्यांवर एकूण ७० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. यावेळी पूर्ण बिल देण्यात आले असल्याचे सांगितले गेले आहे.
कारल्यातून लाखोंची कमाई! उत्पादनाबरोबरच वाढीव दराने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस
महाराष्ट्रातून आलेले आमदार सामान्य पाहुण्यांप्रमाणेच थांबले होते. त्यांच्याकडून पूर्ण बिल देण्यात आले आहे. मात्र, या अधिकाऱ्याने बिलाची रक्कम सांगण्यास नकार दिला. शिंदे गटातील आमदारांचा मुक्काम सुपीरियर आणि डिलक्स खोल्यांमध्ये होता. हॉटेलमधील एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर पीटीआयला ही माहिती दिली होती.
आता 'एक देश एक रेशन कार्ड', तुमच्या फायद्यासाठी देशभरात नवी योजना लागू
दरम्यान, या आमदारांनी अन्य कोणत्या सुविधांचा लाभ घेतला का, असा प्रश्न हॉटेल अधिकाऱ्यांनी विचारण्यात आला. त्यावर खोलीच्या भाड्यात अंतर्भूत असलेल्या सुविधा वगळता आमदारांनी इतर कोणत्याही सोयी घेतल्या नाहीत, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. सध्या नवीन सरकार स्थापन होत असून हे आमदार आनंदात आहेत.
महत्वाच्या बातम्या;
मगरीने मित्रासमोर तरुणाला गिळले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पहा फोटो
कांद्याला प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर का? अमोल कोल्हे यांनी घेतला मोठा निर्णय
"पेरणीसाठी कर्ज द्या, नाहीतर सावकाराकडे शेती गहाण ठेवावी लागेल"
Share your comments