Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. भाजपने (BJP) नुकतीच केंद्रीय संसदीय मंत्रिमंडळाची (Union Parliamentary Cabinet) घोषणा केली आहे. यामध्ये नितीन गडकरी यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे नितीन गडकरी सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.
नितीन गडकरींच्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नितीन गडकरी म्हणाले, कोणाचा वापर करून त्याला गरज संपल्यानंतर फेकून देणे चूक आहे. चागंले दिवस असो अथवा वाईट दिवस तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा हाथ पकडला तर तो कधीच सोडू नका. फक्त उगवत्या सुर्याचीच नाही तर जो सूर्य मावळतो आहे त्याची देखील पूजा करणे आवश्यक असते.
नितीन गडकरी यांनी हे विधान करून त्यांच्या मनातील नाराजी एकप्रकारे व्यक्त केल्याचे दिसत आहे. गडकरी नागपूरमधील (Nagpur) एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमात बोलताना गडकरींनी उद्योजकांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, एखादी व्यक्ती तेव्हा संपत नाही जेव्हा तो हारतो. व्यक्ती तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणे सोडून देतो.
"महाराष्ट्राच्या धर्तीवर खोके हराम नावाची संघटना, त्यात बोकेही आहेत"
म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीही सोडू नका. व्यवसाय, समाजसेवा आणि राजकारण या क्षेत्रात जनसंपर्क हीच त्या व्यक्तीची खरी ताकद असते. त्यामुळे जनसंपर्क वाढता कसा राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे.
7th Pay Commission: कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की नाही? सरकारने दिली माहिती...
कार्यक्रमात बोलताना गडकरींनी एक जुना रंजक किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले, जेव्हा मी विद्यार्थी नेता होतो, तेव्हा काँग्रेस (Congress) नेते श्रीकांत जिचकर यांनी मला चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की मी एकवेळी विहीरीत उडी मारेल पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही.
महत्वाच्या बातम्या:
Gold Silver Price: सोन्या चांदीच्या दरात नरमाई! चांदी 24300 रुपयांनी स्वस्त...
Monsoon Update: राज्यात पावसाची उघडीप! १ सप्टेंबर पासून पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस...
Share your comments