1. बातम्या

बातमी कामाची! ब्राझीलच्या जैवइंधन धोरणामुळे सोयाबीनला आधार, शेतकऱ्यांनो जाणून घ्या..

देशातील निर्यातीवरही परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरावर दबाव आला. दुसरीकडे अर्जेंटिनात दुष्काळामुळे सोयाबीन उत्पादन घटले तरी ब्राझीलमध्ये उत्पादनात मोठी वाढ झाली. त्यामुळे बाजाराला जास्त आधार मिळाला नाही. पण ब्राझीलने जैवइंधनाचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतला. ब्राझीलमध्ये जैवइंधनासाठी ७० टक्के सोयातेल वापरले जाते. यामुळे सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश

सध्या देशातील निर्यातीवरही परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरावर दबाव आला. दुसरीकडे अर्जेंटिनात दुष्काळामुळे सोयाबीन उत्पादन घटले तरी ब्राझीलमध्ये उत्पादनात मोठी वाढ झाली. त्यामुळे बाजाराला जास्त आधार मिळाला नाही. पण ब्राझीलने जैवइंधनाचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतला. ब्राझीलमध्ये जैवइंधनासाठी ७० टक्के सोयातेल वापरले जाते. यामुळे सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आपल्याला माहीतच आहे की जगात सोयाबीन उत्पादनात ब्राझील आघाडीवर आहे. पण ब्राझीलमध्ये एकूण उत्पादनाच्या निम्मेही गाळप होत नाही. ब्राझील थेट सोयाबीनची निर्यात जास्त करतो. त्यामुळे ब्राझीलची सोयातेल आणि सोयापेंड निर्यात तुलनेत कमी आहे. परिणामी अर्जेंटिना सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असूनही सोयातेल आणि सोयापेंड निर्यातीत आघाडीवर असतो. यंदा अर्जेंटिनात दुष्काळामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली.

पण ब्राझीलमध्ये उत्पादन वाढले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अर्जेंटिनातील उत्पादन घटीचा जास्त परिणाम जाणवला नाही. ब्राझीलमध्ये जैवइंधनात सोयातेलाचा मोठा वापर होतो. सध्या ब्राझीलमध्ये जैवइंधान मित्रणाचे प्रमाण १० टक्के आहे. ते एप्रिलपासून १२ टक्के करण्याचे धोरण ब्राझील राबविणार आहे.

तर २०२६ पर्यंत इंधनात जैवइंधानाचे प्रमाण १५ टक्के करण्याचे उद्दिष्ट ब्राझील नॅशनल एनर्जी पाॅलिसी कमिटीने जाहीर केले. यापूर्वी ब्राझीलने मार्च २०२३ पर्यंत १५ टक्के जैवइंधन वापराचे उद्दिष्ट ठेवले होते. पण २०२१ मध्ये महागाई वाढल्याने सरकारने उद्दिष्ट १० टक्क्यापर्यंत आणले होते.

शिर्डीच्या महापशुधन एक्सपो मध्ये पशुपालकांना मिळणार धेनू ॲपचे आधुनिक तंत्रज्ञान...

ब्राझीलमध्ये मागील काही वर्षांपासून जैवइंधनाला मागणी वाढली. त्यामुळे ब्राझीलमधील जैवइंधन क्षेत्राने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. जैवइंधन निर्मिती उद्योग, खाद्यतेल उद्योग, आणि वाहन निर्मिती उद्योगांनी जैवइंधन वापराचे प्रमाण २०२४ पर्यंत १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असाही अंदाज व्यक्त केला.

ब्राझीलचा सोयातेलाचा वापर वाढणार : ब्राझीलमध्ये जैवइंधन उत्पादनासाठी ७० टक्के सोयातेलाचा वापर केला जातो. सरकारने जैवइंधन वापराचे उद्दिष्ट २ टक्क्यांनी वाढवले. यामुळे जैवइंधन निर्मितीसाठी ८ लाख टन सोयातेलाचा अधिक वापर होईल. म्हणजेच ब्राझीलचा सोयातेल वापर वाढणार आहे. यंदा ब्राझीलमध्ये ५२७ लाख टन सोयाबीन गाळपाचा अंदाज आहे. यातून सोयातेलाचे उत्पादन ४०४ लाख टन आणि सोयापेंडचे उत्पादन १०८ लाख टन होईल, असा अंदाज कोनाब या संस्थेने व्यक्त केला.

गोगलगाय शेतकऱ्यांच्यापुढचे टेन्शन

देशातील दर कधी सुधारतील?
सध्या देशातल बाजारात सोयाबीनची आवक जास्त आहे. त्याचाही दरावर दबाव आहे. सध्या सोयाबीनला ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळतोय. एप्रिलच्या मध्यानंतर आवक कमी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर सुधारू शकतात, असाही अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

अर्जेंटिनात यंदा दुष्काळ पडला. ब्राझीलकडून सोयातेलाचा पुरवठा वाढण्याची शक्यता होती. पण जैवइंधन धोरणामुळे पुरवठा कमी राहील. सध्या बॅंकींग क्षेत्रातील संकटामुळे सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडवर दबाव आहे. पण हा दबाव जास्त काळ टिकेल, असे वाटत नाही. ब्राझीलच्या जैवइंधन धोरणाचाही आधार मिळू शकतो.

शेतकऱ्यांनो पपई ,केळी,टोमॅटो आणि भाजीपाला पिकावरील व्हायरस, जाणून घ्या..
शेतकऱ्यांनो लव्हाळा व्यवस्थापन करताना या गोष्टी आहेत आवश्यक, जाणून घ्या..
शेतकऱ्यांनो शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर, जाणून घ्या..

English Summary: News work! Brazil's Biofuel Policy Supports Soybeans, Farmers Know.. Published on: 24 March 2023, 09:58 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters