मधमाशी पालन उद्योगात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांना तसेच संस्थानास 'मधमाशी मित्र पुरस्कारा'ने गौरविण्यात येणार आहे. मध उद्योगाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी तसेच मध उद्योगाला चालना व गती देण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे मधमाशी मित्र पुरस्कारासाठी इच्छुक असणाऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून देण्याची विनंती जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्याकडून करण्यात आली आहे.
याबाबत आवश्यक असणारी माहिती व विहित नमुन्यात भरून दयावयाचा अर्जाचा नमुना मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध असून इच्छुकांनी तो उपलब्ध करून घ्यावा. त्यामधील सर्व माहिती व फॉर्म भरून मंडळाच्या जिल्हा कार्यालयात 8 मे 2023 पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने केले आले आहे. मधमाशी मित्र पुरस्कारासाठी 8 मे ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्जाचा नमुना लवकरात लवकर भरून जमा करावे.
मधसंचालनालय, महाबळेश्वर येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यातील मध उद्योगात कार्य करणाऱ्या मधपाळ, तसेच प्रगतीशील मधपाळ, ब्रान्ड धारक मधपाळ शेतकरी सातेरी, मेलीफेरा, आग्या मधमाशीपालन संकलन या कार्यात कार्यरत असणाऱ्यांची निवड करुन मधमाशी मित्र पुरस्कार 20 मे 2023 रोजी प्रदान केले जाणार आहेत.
मधमाशी मित्र पुरस्कारासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत---
1) अर्जदार व्यक्ती/संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
2) मध उद्योग प्रशिक्षण घेऊन किमान 10 वर्षे मध उद्योगाचे कार्य केलेले असावे.
3) सर्वात जास्त मधोत्पादन व वसाहती असल्यास प्राधान्य
4) मध उद्योगात विस्तार, प्रशिक्षण, प्रजननाद्वारे वसाहत संख्या वाढविणे, संशोधन, मधोत्पादन, मेण उत्पादन, साहित्य निर्मिती, प्रयोग, मध प्रक्रिया व उप उत्पादनांचे संकलन (रॉयल जेली,पराग, विष, प्रोपोलिस ) काम केलेले असावे.
5) स्वतःचा ब्रँड विकसित केलेला असल्यास प्राधान्य,
6) वसाहत विकसित करून विक्री करणाऱ्यास प्राधान्य
7) प्रचार-प्रसिद्धी अंतर्गत शासनाच्या उपक्रमात सहभाग असावा, मंडळाकडे मध पुरवठा करणाऱ्यास प्राधान्य.
अधिक बातम्या
बारसू रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक, शिंदे -फडणवीस सरकारवर केला गंभीर आरोप
EPFO: पेन्शनबाबत मोठी अपडेट, कामगार मंत्रालयाने दिली माहिती...
तुम्हालाही एका वर्षात 1 लाख रुपयांपर्यंत पेन्शन हवी असेल तर हे काम लवकर करा
Share your comments