शेतकरी बंधू शेती करत असताना उत्पन्नाचे कोणत्याही कारणाने नुकसान होऊ नये याकरिता बरीच काळजी घेत असतो. मात्र असं असलं तरी वन्यप्राण्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतातील पिकांचे अमाप नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे पीक संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झेलावं लागत आहे.
आर्थिक नुकसानीबरोबर शेतकऱ्यांच्या श्रमाचे देखील तेवढेच नुकसान होत आहे. या सर्व नुकसानाचा विचार करत होत असलेल्या नुकसानीला आळा घालण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी राज्य शासनाने शेतीमध्ये कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देणार असल्याचे सांगितले आहे.
वन्यप्राण्यांपासून आपल्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी बरेच शेतकरी नानाप्रकारचे प्रयोग करत असतात. काही शेतकरी पीक संरक्षणासाठी रात्री अपरात्री पिकांची देखभाल करण्यासाठी शेतात जातात. यातून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. कारण वन्यप्राणी शेतकऱ्यांवर अचानक हल्ला देखील करू शकतात. यावर तोडगा म्हणून राज्यशासनाने, महाराष्ट्र राज्यातील संवेदनशील गावांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत व्याप्ती करून त्यात सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याकरता मान्यता दिली आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत सौर ऊर्जा कुंपण अनुदानासाठी जवळजवळ ७५% किंवा पंधरा हजार रुपये एवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. शिवाय सौर ऊर्जा कुंपणासाठी उरलेला २५% वाटा हा संबंधित शेतकऱ्याचाच राहणार आहे.तसेच ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीस शासनाद्वारे २५ टक्क्यांचा वाटा जमा करण्यात येईल.
शिवाय कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे यासंबंधी देखील माहिती समोर आली आहे. या अनुदानासाठी केवळ संवेदनशील शेतकऱ्यांची निवड होणार आहे. तसेच या अनुदानासाठी सौर ऊर्जा कुंपण साहित्याचे निर्धारण करणे, गुणवत्ता नियंत्रण करणे यांसारख्या महत्वाच्या बाबी हे मुख्य वनरक्षक अध्यक्षतेखाली असणाऱ्या समित्यांद्वारे करण्यात येणार आहे. २०२२-२३ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमधील जवळपास शंभर कोटींपैकी पन्नास कोटी इतका निधी सौर ऊर्जा कुंपण या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
बातमी फायद्याची! शेतकरी बंधुनो आता काळ्या हळदीच्या शेतीतून कमवा लाखो रुपये
LPG Cylinder Price: महागाईचे सत्र सुरूच; महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ
Aadhar Card Update : लग्नानंतर आधार कार्डमध्ये या पद्धतीने बदला आपले आडनाव; जाणुन घ्या याविषयी
Share your comments