कांदा सध्या कांदा बाजाराविषयी खूप बातम्या माध्यमात येत आहेत.आता अजून एक कांद्याविषयीच आहे,पण यामुळे कांदा उत्पादकांना किंवा ग्राहकांना रडू येणार नाही. हाती आलेली बातमी ही कांदा उत्पादकासाठी महत्वाची आहे. फलोत्पादन क्षेत्रात संशोधन व विस्तार कार्य क्षेत्रात आघाडीवर असलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या (NHRDF) कर्नाल (हरियाणा) येथील विभागीय संशोधन केंद्राने एनएचओ ९२० ही कांद्याची नवी जात विकसित केली आहे.
उशिरा होणाऱ्या रब्बी हंगामासाठी या जातीच्या लागवडीच्या प्रायोगिक चाचण्या सुरू झाल्या आहेत. इतर कांदा जातींच्या तुलनेत ही जात लवकर म्हणजेच ७५ ते ८० दिवसात तयार होते, अशी माहिती या जातीला निर्माण करणारे आणि केंद्राचे उपसंचालक डॉ. बी. के. दुबे यांनी दिली. यावेळी दुबे म्हणाले की, ही नवी जात विकसित करण्यासाठी चार वर्षे संशोधन सुरू होते.सातत्यपूर्ण संशोधन व चाचण्या घेतल्यानंतर या जातीचा काढणीचा कालावधी हा नेहमींच्या जातींपेक्षा १५ ते २० दिवसांनी कमी झाला आहे. हवामानाच विचार करता सध्या ही जात उत्तर भारतातील राज्यात लागवडीसाठी प्रक्षेत चाचण्यानंतर उपलब्ध होईल.सध्या संशोधन प्रक्षेत्रावर प्रति हेक्टरी सरासरी ३५० ते ४०० क्किंटल उत्पादन मिळाले आहे.
हेही वाचा : कांदा बियाणाचा यशस्वी प्रवास : संदीप प्याजचा अख्या देशात डंका ; मिळवला राष्ट्रपतींकडून पुरस्कार
या जातीची संशोधन केंद्रामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानुसार,लागवड करुन विविध निरीक्षणे नोंदविले आहेत.भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुसा येथील राष्ट्रीय वनस्पती आनुवंशिक संशोधन कार्यालयाकडून या जातीस नॅशनल आयडेंटिटी नंबर मिळाला आहे. त्यामुळे उत्तर भरतातील शेतकऱ्यांना लवकरच ही जात उपलब्ध होणार आहे. दरम्यान संशोधन केंद्राच्या माध्यमातून हरियाणा राज्यातील काही निवडक शेतकऱ्यांना ५० किलो बियाणे प्रायोगिक तत्वावर वितरित केले आहे.
हेही वाचा : आता नाही होणार कांद्याचे नुकसान, टाटा स्टीलने आणलं साठवणुकीसाठी स्मार्ट सोल्यूशन
Share your comments