शेतकऱ्यांपुढे नवं संकट; राज्यात खतांची टंचाई

Wednesday, 15 July 2020 12:54 PM

 

खरिप हंगामातील पेरणी झाल्यानंतर पिक बहरात असून खत देण्याची आवश्यकता आहे. मात्र ऐन हंगमातच शेतकऱ्यांना  आवश्यक खतांच्या टंचाईला सोमोरे जावे लागत आहे. मागणी केलेली खते मिळत नाहीत, उपलब्ध असल्यास जास्त दराने  खरेदी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याची चित्र समोर येत आहे.  औरंगाबाद, जालना, बीड, आदी जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित असलेलं खत मिळत नसल्याची स्थिती कायम आहे. अनेक भागात शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा आजही जाणवत आहे. इतरही अनेक खते मागमीनुसार मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात.

नांदेड, परभणी, हिंगोली, जिल्ह्यात युरियाची साठेबाजी करुन शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात खत पुरवठा व्यवस्थित होत असून युरियाची उपलब्धता मागणीनुसार होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातील युरियाचा तुटवडा भासला. शेतकऱ्यांना हवी असलेली मिश्रखते मिळाली नाहीत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या खतांवरच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले.  सांगलीतही रासायनिक खतांची कमतरता भासू लागली आहे. खतांची उपलब्धता कमी असल्याने  शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. रत्नागिरीतही सुरुवातीला खताची पुरवठा खंडित झाला होता, परंतु आता पुरेसा पुरवठा केला जात आहे. 

पुणे जिल्ह्यातील अनेक भागात युरियाची टंचाई भासत आहे. विक्रेत व कंपन्यांकडून युरियासोबत डीएपी किंवा अन्य खते खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. सातारा जिल्ह्यात मात्र अगळीच परिस्थीती पाहण्यास मिळत आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात  आतापर्यंत ३४ हजार टन युरियाची विक्री झाली असून सहा  हजार ९६० टन युरिया शिल्लक आहे. इतका शिल्लक असला तरी शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याचे चित्र आहे. काही कृषी सेवा केंद्रांकडून  टंचाई भासवून अधिक दरात विक्री करत आहे.  अहमदनगर जिल्ह्यातही  विक्रेते उपलब्ध असलेल्या  खताचीही टंचाई निर्माण केली जात असून शेतकऱ्यांना अधिक दरात युरिया खरेदी करण्यास सांगितले जात आहे. 

सोलापुरातील शेतकऱ्यांनाह आर्थिक झळ सोसावी लागत आहे.  डीएपीचा सध्याचा दर प्रतिपिशवी १२०० ते १२५० रुपये आहे, पण १३०० ते १४०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. युरियाचा दर २६७ रुपये आहे, पण त्यालाही ३५० ते ४०० रुपयांपर्यंत दर आकराला जात आहे.  जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना जादा दरात खतांची खरेदी करावी लागत आहे. युरिया १०.२६.२६. आणि दाणेदार फॉस्फेटची टंचाई सर्वत्र आहे. याला पर्याय म्हणून  डीएपी व पोटॉश हे महागडे खत शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे.  नाशिक जिल्हयात मागणीच्या तुलनेत युरियाचा तुटवडा आहे.

दरम्यान राज्यात खताची टंचाई नाही, मात्र मागणीत वाढ झाली आहे,  कोविडमुळे शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याच पाळीवर खतांची जादा खरेदी करुन साठा करुन ठेवला आहे, तसेच मॉन्सून आधी सर्वत्र चांगला झाल्यामुळे खत वापर आणि मागणीत उसळी दिसते आहे, असे राज्याचे  निविष्ठा व गुणनियंत्रक संचालक विजयकुमार घावटे यांनी सांगितले.

fertilizers fertilizers shortage fertilizer urea राज्यात खतांची टंचाई shortage of fertilizers in state खते युरिया युरियाची टंचाई
English Summary: New trouble in front of farmers, shortage of fertilizers in state

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.