आता महाराष्ट्र जनावरांवर उपचाराची सुविधा ही घरीच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड सोबत करार केला आहे. बी एफ आय एल खाजगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेची सहाय्यक कंपनी आहे. इंडसइंड बँकेने म्हटले आहे की, त्यांची सहाय्यक कंपनी भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीने महाराष्ट्र सरकार सोबत एक करार केला आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी उपचार याची सुविधा घरीच उपलब्ध करण्यात येणार आहे. बँकेने यासंबंधी माहिती देताना म्हटले की या योजनेचे नाव महा पशुधन संजीवनी योजना असे आहे. या योजनेद्वारे पशुधनाच्या चिकित्सा सेवेसाठी शेतकऱ्यांना एका फोन कॉलवर साह्यता केली जाईल.
त्यासाठी एक टोल फ्री नंबर 1962 हा जानेवारी 2021 पासून चालू करण्यात येईल. या कंपनीने महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार राज्य सरकार आणि इंडसइंड बँक चे अधिकारी त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या रूपामध्ये महा पशुध संजीवनी योजनेला मदत करण्यासाठी या करारावर स्वाक्षरी केली.
हेही वाचा :पुढच्या महिन्यात मोदी सरकार लाभार्थीना 2000 रुपये देणार , लिस्ट मध्ये नाव असे चेक करा
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र मध्ये असलेल्या 31 जिल्ह्यांमधील 81 तालुक्यांमध्ये पशुधनाच्या उपचाराची सुविधा मिळेल. या सगळ्या परिसरात पशुधनाची एकूण संख्या 1.96 कोटी आहे. या योजनेद्वारे पशुपालक शेतकऱ्यांना पशुचिकित्सा साठी अंतर्भूत केल्या जाणाऱ्या सेवांमध्ये जनावरांचा उपचार, लसीकरण, कृत्रिम गर्भधारणा, तसेच त्यांची देखभाल आणि पशुपालन संबंधित सगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध केली जाणार आहे.
Share your comments